Weather Forecast: कडाक्याच्या थंडीनं देश गारठला पण, ‘इथं’ पावसानं चिंब भिजला; पाहा तुमच्या भागात काय परिस्थिती

Weather Forecast: गेल्या वर्षामध्ये म्हणजेच 2022 मध्ये शेवटच्या काही दिवसांत थंडीनं जोर पकडण्यास सुरुवात केली आणि नव्या वर्षाचं स्वागत याच हुडहूडीनं झालं. संपूर्ण उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका सध्या चांगलाच जोर धरताना दिसत आहे. असं असतानाच महाराष्ट्रातही बहुतांश भागांमध्ये तापमान चांगलंच कमी झालं आहे. हो पण, या परिस्थितीमध्ये मागील 24 तासांत लक्षद्वीप (Lakshdweep), अंदमान – निकोबार (Andaman Nicobar), बिहार (Bihar), आंध्र प्रदेशचा (Andhra pradesh) किनारी भाग येथे पावसाच्या सरी कोसळल्याची नोंद करण्यात आली. याचे परिणाम सदर भागांनजीक असणाऱ्या प्रदेशांमध्येही दिसून आले. 

काश्मीर- हिमाचलमध्ये रक्त गोठवणारी थंडी (Kashmir, himachal pradesh)

देशाच्या उत्तरेकडे, काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश या भागांमध्ये रक्त गोठवणारी थंडी पडली आहे. पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळं येतील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिथे उत्तराखंडमध्येसुद्धा (Uttarakhand) परिस्थिती फारशी वेगळी नाही. कनातल, नैनीताल, मसुरी (Masuri), टेहरी या भागांमध्ये प्रंचड गारवा जाणवत आहे. शिवाय या भागांमध्ये धुक्याचं प्रमाणही जास्त असल्यामुळं याचे थेट परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहेत. (Weather Forecast update cold wave in kashmir himachal maharashtra latest marathi news )

हेही वाचा :  Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत मोठा बदल, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

कोणत्या राज्यांमध्ये पावसाची हजेरी? 

स्कायमेटनं (Skymet) वर्तवलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या म्हणजेच बुधवार आणि गुरुवार या दिवशी किनारपट्टी भागांना पावसाचा तडाखा बसणार आहे. यामध्ये तामिळनाडू (Tamilnadu), आंध्र प्रदेश, अंदमान निकोबार बेट समूहांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील (maharashtra coastal region) किनारी भागांमध्ये यामुळं ढगाळ वातावरण असू शकतं अशीही शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत काय परिस्थिती? 

आयएमडीच्या वृत्तानुसार पुढच्या दोन दिवसांमध्ये थंडीचा कडाका कायम असणार आहे. पण, 8 तारखेनंतर साधारण 11 तारखेपर्यंत राज्यातील विदर्भ पट्ट्यामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढेल. याचे परिणाम राज्याच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्येही दिसून येणार आहेत. 

श्रीनगरमध्ये तापमान उणे 5 अंशांच्याही खाली (Srinagar)

संपूर्ण देशात यंदाच्या वर्षी चांगलीच थंडी पडलेली असतानाच श्रीनगरमध्ये तापमान उणे 5 अंशांच्याही खाली गेलं आहे. इथं पहलगाम (Pahalgaon) आणि कुलगाम या भागांमध्ये थंडीचा कडाका तुलनेनं जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या काही दिवसांमध्ये नागरिकांना इथं कोरड्या थंडीचा सामना करावा लागलणार आहे. सोसाट्याचा, झोंबणारा गार वारा आणि धुक्यामुळं इथं काही अडचणीही उदभवू शकतात. 

हेही वाचा :  मालदिवमधील 'माल' शब्दाचा नेमका अर्थ काय; जाणून घ्या या बेटाबद्दल सर्वकाही



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …