नीता अंबानींनी थाटामाटात केलं लाडक्या सुनबाईचं स्वागत

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी पुन्हा एकदा सासरे बनण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने आपली लॉंगटाइम गर्लफ्रेंड राधिका मर्चंटसोबत राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत रोका कार्यक्रम करून अंबानी घराण्याशी कायमची गाठ बांधली आहे. रिलायन्स समुहानेच एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली होती, त्यानंतर अँटिलियामध्ये एका भव्य सोहळ्याची तयारी सुरू झाली होती. आणि असं का नाही घडणार म्हणा, अंबानी कुटुंब अगदी लहानात लहान क्षणही मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी ओळखलं जातं. अशा परिस्थितीत सुनेचे स्वागत करण्याचा प्रश्नच असताना ते मागे कसे राहतील?

खरं तर, अनंत अंबानींसोबत रोका करून राधिका मर्चंट अँटिलियाला परतली तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी तिचं अगदी थाटामाटात स्वागतच तर केलंच पण नीता अंबानींनीही हा प्रसंग खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. यावेळी त्यांनी आपल्या भावी सुनेचे गुलाबांची पुष्पवृष्टी करून स्वागत तर केलेच, पण ढोल-ताशांच्या गजरात आजूबाजूचे वातावरणही अगदी रंगतदार झाले. पण मोठमोठे स्टार्स आणि बॉलीवूड अभिनेत्री अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या भव्य स्वागताला उपस्थित असताना सर्वांची नजर मात्र नीता अंबानींवरून हटत नव्हती. त्यांचा लुक इतका भन्नाट होता की त्यासमोर नवरीही फिकी पडेल. (सर्व फोटो – योगेन शहा)

हेही वाचा :  तेच कपडे पुन्हा वापरले? Radhika Merchant च्या साधेपणानं जिंकली मनं; पाहून म्हणाल अंबानींची होणारी सून लाखात एक

ग्रीन ड्रेसमधील मिसेस मुकेश अंबानी

आपली भावी सून राधिका मर्चंटसोबत घरी पोहोचलेल्या नीता अंबानी यांनी यावेळी अतिशय सुंदर पारंपारिक पोशाख अर्थात ट्रेडिशनल आउटफिट वेअर परिधान केला होता. ज्यामध्ये त्या भन्नाट दिसत होत्या. नीता अंबानी यांनी यावेळी हिरव्या रंगाचा सूट परिधान केला होता, जो पूर्णपणे सिल्क फॅब्रिकमध्ये बनलेला होता. हा एक प्रकारचा थ्री पीस अटायर होता, ज्यामध्ये मॅचिंग पॅंटसोबत स्ट्रेट कुर्ता आणि त्याच रंगाचा दुपट्टा होता. एकूण ड्रेसचा पॅटर्न मोनोटोन लूकमध्ये ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये सोनेरी धाग्यांचे हाताने सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येत होते.

(वाचा :- क्रॉप शर्टमधील उर्वशीचे थेट चाहत्यांच्या काळजावर वार, लुकपेक्षा केसातल्या त्या दोन क्लिप्सचीच झाली तुफान चर्चा)

दागिन्यांनी लावले चार चॉंद

नीता अंबानींनी स्वतःसाठी निवडलेल्या या सुंदर ड्रेसमधील कुर्ता आणि पँटवर खूप हलके काम केलेले होते पण त्यासोबत असलेल्या दुपट्ट्यावर मात्र खूप भरीव काम केले होते. कुर्ता आणि पँटच्या बॉर्डरवर गोल्डन गोटा पट्टी जोडली गेली होती, तर त्याचवेळी दुपट्ट्यावर मात्र फ्लोरल मोटिफ्स कोरलेले होते. या आउटफिटचे कलर कॉम्बिनेशन नीता अंबानींवर खूप सुंदर व आकर्षक दिसतच होते पण त्याची स्टाइलही नीता अंबानींनी अगदी वेगळ्या पद्धतीने केली होती जी सर्वात जास्त उठून दिसत होती. यादरम्यान नीता अंबानी यांनी चेहऱ्यावर हलका मेकअप आणि त्यासोबत कपाळावर लाल ठळक टिकली लावली होती. त्याचवेळी, कानात गोल्डन इयर चेन झुमके घातले होते आणि लुक कम्प्लिट करण्यासाठी दोन्ही हातात कडे घातले होते.

हेही वाचा :  ‘या’ एका भीतीमुळे सलमान खानने आजपर्यंत केलं नाही लग्न, इतक्या मोठ्या अभिनेत्याला नेमकी अशी काय असावी अडचण?

(वाचा :- रेड ड्रेस व पायावरील स्लिट कट ठरला आकर्षण, श्रद्धाच्या कातील अदा बघून चाहतेच नाही तर पती राहुलचीही गेली विकेट)

पिंक शरारा सेटमध्ये नवरीबाई

अनंत अंबानींसोबत आपलं नातं ऑफिशियली घोषित करून मुंबईत परतलेली राधिका मर्चंट पेस्टल गुलाबी शरारा सेटमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. राधिकाच्या या आउटफिटमध्ये थाइजच्या लांबीचा कुर्ता देण्यात आला होता, ज्यासोबत मॅचिंग शरारा टीमअप केला होता. ओवरऑल आउटफिटवर हातांनी केलेले जडाऊ वर्क दिसन येत होते. ज्यामुळे तिला खूप रिच लुक मिळत होता. राधिकाने या ड्रेससोबत जो दुपट्टा घेतला होता तो पूर्णपणे नेटचा होता, ज्यावर हॉरिजॉन्टल पॅटर्नमध्ये फ्लोरल वर्क केले होते.

(वाचा :- अनिल कपूरच्या बर्थ डेला बॅकलेस जान्हवी व शनायास बघून फुटला लोकांना घाम, बर्थडे काकाचा पण भाव खाल्ला या ललनांनी)

साधेपणाने जिंकलं मन

पार्टीची मुख्य लाइमलाइट असूनही राधिकाने स्वतःला अजिबात चमकदार किंवा जास्त झगमगणारा लुक दिला नव्हता. तिने चेहऱ्यावर कमीत कमी मेकअप केला होता आणि केस मोकळे सोडले होते. त्याचवेळी, तिने कानात स्टडीड डायमंड जडलेले कानातले घातले होते. ज्यासोबत तिने डोळे आणि ओठ चांगले हायलाइट केले होते. लुकमध्ये चार चॉंद लावण्याचे काम कपाळावरची एक छोटासी टिकली करत होती. बरं, राधिकाचा लूक तिच्या जागी अफलातूनच होता, पण नीता अंबानी मात्र इतकी मोहक दिसत होत्या की इच्छा असूनही त्यांच्यावरून नजर हटवता येत नव्हती.

(वाचा :- मिनी स्कर्ट व को-आर्ड सेट घालून घरी गेली मलायका अरोरा, मलायकापेक्षा मरून साडीतील आईनेच जिंकलं नेटक-यांचं काळीज)

हेही वाचा :  अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या साधेपणाची सर्वांना भुरळ,सिंपल ड्रेसमध्ये राधिका मर्चंटने स्वत: वाढले साधूंना जेवण

​राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात केला साखरपुडा

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीची राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात गुरुवारी एंगेजमेंट अर्थात रोका सोहळा झाला. याचे फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. अनंत आणि राधिकाचे लग्न कधी होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राधिका मर्चंट ही उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी असून ते एका फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे CEO आहेत. अनंत आणि राधिका एकमेकांना खूप आधीपासूनच ओळखत असल्याने अनेकदा त्यांच्या रिलेशनशीपच्या अफावाही उठवल्या गेल्या होत्या. पण या समारंभामुळे त्यांच्या नात्याला एक नाव व ओळख मिळाली आहे आणि येत्या काही महिन्यांत ते दोघे नवरा-बायको बनून जगासमोर येतील यात प्रश्नच नाही.

(वाचा :- ताडासारख्या उंच सोनाक्षी सिन्हाने घातला गुडघ्यापेक्षा छोटासा स्कर्ट,किलर फिगर व नखरेल अदांनी केलं इंटरनेट डाऊन)

असं झालं धुमधडाक्यात राधिकाचं स्वागत

नीता अंबानींचे मनमोहक रूप..!

सासू सुनेचा जबरदस्त लुक



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …