भारताजवळ असणाऱ्या ‘या’ ठिकाणी परपुरुषाशी संबंध ठेवत महिला होतात गर्भवती; Pregnancy Tourisam बद्दल तुम्ही ऐकलं?

Ladakh Trending News : मातृत्वं प्रत्येक महिलेला परिपूर्णत्वाची जाणीवर करून देतं असं म्हणतात. एखादा जीव गर्भात वाढवून त्यानंतर त्याला या सृष्टीचक्रात जन्म देणं, त्याचं संगोपन करणं हे सर्वकाही निव्वळ अविश्वसनीय. म्हणूनच अनेकदा म्हटलं जातं, की जेव्हा कोणतीही स्त्री बाळाला (Pregnancy) जन्म देते, तेव्हा तिचा नव्यानं जन्म होत असतो. पण, सर्वच महिलांच्या आयुष्यात मातृत्त्वाचं वरदान लाभतं असं होत नाही. बदलणारा काळ, प्रत्येकाच्या शरीरात असणारं वेगळेपण आणि शरीराचेही असणारे नियम या साऱ्यातून कैकजणींना आई होण्याचं सुख अनुभवता येत नाही. पण, या निराशेवरही आशेचा एक किरण आहे जो अशा महिलांना जगण्याची एक नवी उमेद देत आहे. 

प्रेग्नेन्सी टुरिझमविषयी तुम्ही काही ऐकलंय का? (Pregnancy Tourism)

ही नवी उमेद भारतालगतच एका दुर्गम भागात असणाऱ्या समुदायाकडून मिळते. तुम्हाला याविषयी माहिती आहे का? लडाखमध्ये एक असा समुदाय आहे, जिथं महिला येतात आणि परपुरुषासोबत संबंध ठेवून गर्भवती राहतात. ब्रोक्पा, असं या समुदायाचं नाव. सिंधू नदीच्या खोऱ्यात लडाखमध्ये असणाऱ्या बियामा, दाह, हनु, दारचिक ही या गावांची नावं. इथे असणाऱ्या ब्रोक्पा समुदायाचे लोक आपण आर्य वंशाचे असल्याचं सांगतात. 

हेही वाचा :  Weather Updates : या जिल्ह्यांत सर्वाधिक कमी तापमान, राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे

हा समुदाय सध्याच्यात काळात सर्वांसमोर आला, ज्यावेळी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या बळावर झालेल्या प्रगतीमुळं त्यांच्याबाबची माहिती संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. ब्रोक्पा समुदायातील पुरुषांसोबत (Men) राहण्यासाठी इथं येणाऱ्या महिलांमध्ये परदेशी महिलांचा आकडा मोठा आहे. सध्या या संकल्पनेकडे प्रेग्नेन्सी टुरिझम म्हणून पाहिलं जात आहे. 

परदेशी महिला इथं का येतात? (brokpa tribe pregnancy)

ब्रोक्पा समुदाय आर्य वंशाचा असल्यामुळं आपली मुलंही आर्य असावीत, त्यांच्यासारखीच चाणाक्ष आणि चतुर असावीत अशी या महिलांची कामना असते. या समाजातील माणसांचे चेहरे अतिशय वेगळे असतात. इथं जर्मनी म्हणू नका किंवा जगातील आणखी कोणता देश, महिला गरोदर राहण्यासाठी येतात ही बाब अनेकांनाच थक्क करते. 

कोण आहेत ही ब्रोक्पा समुदायातील मंडळी? 
प्राथमिक माहितीनुसार बाहेरील प्रांतांतून या समुदायातील लोकांनी भारतीय उपखंडात पाऊल ठेवलं. वैदिक संस्कृतीवर त्यांचा प्रचंड विश्वास असल्यामुळं त्यांच्या कृतीतूनही ही बाब झळकताना दिसते. त्यांच्या भाषेवर संस्कृतचा प्रचंड प्रभाव दिसून येतो. 

लोककथा आणि पारंपरिक साहित्यावर विश्वास ठेवल्यास सातव्या शकतामध्ये पश्चिम हिमालयातून ही मंडळी गिलगिट- बाल्टिस्तानच्या प्रदेशात आली. हा भाग सध्या मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचं सांगण्यात येतं. जगाच्या पाठीवर अशा अनेक जागा आहेत, अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं काही अनपेक्षित प्रथा आणि रुढी आजही सुरुच आहेत. ज्याविषयी जेव्हाजेव्हा माहिती मिळते तेव्हातेव्हा भुवया उंचावतात. 

हेही वाचा :  'उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार'; राज्य शासनाचं अजब फर्मान



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …

Maharastra Politics : ‘रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण…’, सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील …