Anil Kapoor : राम लखन ते मि. इंडिया; जाणून घ्या अनिल कपूर यांचे टॉप 10 सिनेमे…

Anil Kapoor Birthday : ‘एव्हर ग्रीन’ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा आज वाढदिवस आहे. अभिनयासह फिटनेटमुळे ते आजही तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. ते एक उत्तम अभिनेते असण्यासोबत निर्मातेदेखील आहेत. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनिल कपूर यांच्या वाढदिवशी जाणून घ्या त्यांचे टॉप 10 सिनेमे…

राम लखन (Ram Lakhan) : 

राम लखन हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित झाला होता. सुभाष घई यांनी या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, राखी व अमरीश पुरी मुख्य भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा यशस्वी ठरला होता. 

मेरी जंग (Meri Jung) :

मध्यमवर्गीय कुटुंबावर भाष्य करणारा ‘मेरी जंग’ हा सिनेमा 1985 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अनिल कपूरने आठ वर्षीय अरुण शर्माची भूमिका साकारली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन सुभाष घईंनी केलं होतं. 

तेजाब (Tezaab) : 

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितचा ‘तेजाब’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. 1988 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमामुळे माधुरी आणि अनिल कपूरची जोडी हीट झाली. 

हेही वाचा :  हा थ्रिलर चित्रपट पाहताना स्क्रिनवरुन नजर हटणार नाही, संजय मिश्रा यांचा दमदार अभिनय

News Reels

मशाल (Mashaal) :

‘मशाल’ हा सिनेमा 1984 साली प्रदर्शित झाला होता. यश चोप्राने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. या सिनेमात दिलीप कुमार, वहिदा रेहमान व अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. वसंत कानेटकरांनी लिहिलेल्या अश्रूंची झाली फुले या मराठी नाटकावर आधारित हा सिनेमा होता. 

लम्हे (Lamhe) : 

‘लम्हे’ हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित झाला होता. यश चोप्रा दिग्दर्शित या सिनेमात अनिल कपूर, श्रीदेवी आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा आपली जादू दाखवण्यात कमी पडला. 

विरासत (Virasat) : 

‘विरासत’ या सिनेमात अनिल कपूर, तब्बू, अमरीश पुरी, मिलिंद गुणाजी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. 43 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला 16 नामांकन मिळाली होती. 

परिंदा (Parinda) : 

परिंदा या सिनेमात माधुरी दीक्षित, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. विनोद चोप्राने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 

नायक: द रिअल हीरो (Nayak : The Real Hero) : 

थरार नाट्य असणाऱ्या ‘नायक: द रिअल हीरो’ या सिनेमात अनिल कपूर, रानी मुखर्जी अमरीश पुरी, परेश रावल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. एस. शंकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 

हेही वाचा :  'अवतार' च्या Advance Booking ला सुरुवात; रुपेरी पडद्यावर दिसणार निळ्या विश्वाची जादू

वो 7 दिन (Woh 7 Din) : 

‘वो 7 दिन’ या सिनेमात अनिल कपूर प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा 1981 साली आलेल्या ‘अंधा 7 नाटकाल’ या तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. 

मि. इंडिया (Mr. India) : 

‘मि. इंडिया’ हा बॉलिवूडचा एक सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली होती. या सिनेमात अनिल कपूर, श्रीदेवी, अमरीश पुरी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

Anil Kapoor : ‘तिने माझ्यासाठी कपडे शिवले’; आईच्या आठवणीत अनिल कपूर भावूक

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …