खाट नाही तर आत्म्याला शांती नाही…. पोलिसांनी सुरु केला खाटेचा शोध

Crime News : पोलिसांना कधी कोणत्या गोष्टींचा तपास करावा लागेल सांगता येत नाही. गुन्हेगारांसोबत कधी म्हैस तर कधी घोडी यांचाही तपास पोलिसांना करावा लागतो. उत्तर प्रदेशातही (uttar pradesh crime news) असाच काहीसा प्रकार समोर आलाय. बागपत येथील पोलिसांना सध्या एका मृताच्या खाटेचा (bed) शोध घ्यावा लागतोय. घरातून रातोरातच ही खाट गायब झाली. कुटुंबियांच्या दाव्यानुसार जोपर्यंत ही खाट मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.

बागपल जिल्ह्यातील छपरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकरण समोर आलंय. इथल्या एका गावात राहणाऱ्या सुरेश नावाच्या व्यक्तीसोबत हा सर्व प्रकार घडलाय. 1 डिसेंबर रोजी माझ्या मुलीचा अचानक मृत्यू झाला. माझ्या समोरच मुलीचे जीव सोडला, असे सुरेशने सांगितले.

तांत्रिकाने खाट गायब केली 

मुलीच्या मृत्यूनंतर घराच्या बाहेर खाट उभी करुन ठेवली होती. पण जेव्हा अंत्यसंस्कारानंतर घरी परतलो तेव्हा खाट तिथे नव्हती. कुठल्या तरी चोराने खाट चोरली किंवा एखाद्या तांत्रिकाने त्याच्या तंत्रविद्येने ती गायब केली, असा आरोप सुरेश याने लावला आहे. 

खाट सापडली नाही तर अनुचित प्रकार घडेल

यासंदर्भात सुरेशने पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे. खाट शोधून देण्याची मागणी आता सुरेशच्या कुटुंबियांनी केली आहे. चोरीला गेलेली खाट सापडली नाही, तर काही अनुचित प्रकार घडण्याची भीती नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :  सनी लिओनी होणार उत्तर प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल, आता चित्रपट करणार नाही?

तर मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही

जर खाट मिळाली नाही तर मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही असा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. खाट मिळाली नाही तर तिचा आत्मा भटकत राहील. पोलिसांनी लवकरात लवकर ती खाट शोधून द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी या खाटेचा शोध सुरु केलाय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘तानाजी सावंत यांचा तातडीने राजीनामा घ्या, त्यांनी…’, रविंद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आलिशान कारनं (Pune Porsche Accident) चिरडून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार …

‘6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..’, रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, ‘आपण अजून..’

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान …