Kidney Health Tips : मळमळ, खाज सुटणे ही खराब किडनीची लक्षणे, वाढत्या क्रिएटिनला काय जबाबदार?

बिहारच्या चारा घोटाळ्यात अडकलेले माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे प्रत्यारोपण करण्यात आले. अनेक दिवसांपासून ते खराब किडनीच्या समस्येने त्रस्त होते. लालूप्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्यने किडनी दान केली आहे. तुरुंगात असताना लालू प्रसाद यादव यांची क्रिएटिनीन पातळी 5.1 पर्यंत वाढली होती. जी सामान्य किडनीच्या क्रिएटिनिन पातळीपेक्षा 4 पॉईंटने जास्त आहे. क्रिएटिनिनची वाढलेली पातळी सूचित करते की मूत्रपिंड खराब होत आहे. चला जाणून घेऊया क्रिएटिन म्हणजे काय जे मूत्रपिंडाची काय स्थिती आहे ते सांगते.

काय असतं क्रिएटिन

मेयो क्लिनिकच्या मते, क्रिएटिन हे आपल्या स्नायूंमध्ये ऊर्जा-उत्पादक प्रक्रियेचे एक कचरा उप-उत्पादन आहे. निरोगी मूत्रपिंड रक्तातून क्रिएटिन फिल्टर करतात. क्रिएटिनिन तुमच्या शरीरातून लघवीद्वारे बाहेर जाते. रक्तात किंवा लघवीतील क्रिएटिनची पातळी किडनी व्यवस्थित काम करत आहे की नाही हे सांगते.

(वाचा – Foods for Lower Cholesterol: नसांमध्ये जमा झालेलं घाणेरडं फॅट कमी करून HDL चांगल्या फॅटला वाढवतील हे ५ सुपरफूड))

हेही वाचा :  नितीन गडकरी यांच्या हस्ते नरेंद्र महाराज इन्स्टिट्यूट कॉलेज इमारत कोनशिलेचे अनावरण

​किती असावी क्रिएटिनची पातळी

क्रिएटिनची पातळी तुमचे वय, लिंग आणि शरीराच्या आकारावर अवलंबून असते. परंतु क्रिएटिनची सामान्य पातळी प्रौढ महिलांसाठी 0.59 ते 1.04 mg/dL (52.2 ते 91.9 micromoles/L) आणि प्रौढ पुरुषांसाठी 0.74 ते 1.35 mg/dL (65.4 ते 119.3 micromoles/L) मानली जाते.

(वाचा – सायनसला हलक्यात घेऊ नका, नसांना फोडून मेंदू-डोळा करेल खराब, ५ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष)

​हाय क्रिएटिन पातळीची लक्षणे

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, किडनीचा आजार हा सायलेंट किलर आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, प्रारंभिक अवस्थेत त्रासाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. हा रोग जसजसा वाढत जातो तसतसे तुम्हाला यापैकी काही लक्षणे जाणवू शकतात.

  • सूज
  • थकवा
  • वारंवार किंवा क्वचित लघवी
  • भूक न लागणे
  • मळमळ
  • खाज सुटणे

(वाचा – Weight Loss Story: लठ्ठपणामुळे PCOD चा त्रास बळावला, रोज आवळा शॉट्स पिऊन 6 महिन्यात कमी केलं 15 किलो वजन))

​कुणाला क्रिएटिनचा धोका अधिक

प्रत्येकाला किडनीच्या आजाराचा धोका असतो. काही लोकांना किडनी समस्या विकसित होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. यामध्ये ६० वर्षांवरील व्यक्ती, मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण, किडनीच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास असलेले लोक अधिक आहेत. अशा परिस्थितीत क्रिएटिनिन चाचणी वेळोवेळी करून घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचे राष्ट्रपती फक्त हिरवा टी-शर्टच का घालतात?

(वाचा – Causes of Belly Fat: दररोज पोटावरची चरबी वाढतेय, शर्टच्या बटनातून ढेरी डोकावतेय? तुमच्या ७ चुकाच याला कारणीभूत)

​क्रिएटिन कसे कमी करावे

जर तुमची क्रिएटिन पातळी जास्त असेल तर तुम्ही जीवनशैलीत काही बदल करून त्यावर नियंत्रण ठेवू शकता. या बदलांमध्ये प्रथिनांचे कमी सेवन, अन्नात जास्त फायबर, मिठाचा कमी वापर, मद्यपानापासून दूर राहणे, जास्त पाणी पिणे इत्यादींचा समावेश होतो.

(वाचा – Food For Constipation: जुन्यातील जुना बद्धकोष्ठतेचा समूळ नाश करतील हे ६ पदार्थ, आतड्यांमधली घाण काढून टाकतील)

(फोटो सौजन्य – istock)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …