Trending News : पांढऱ्या – पिवळ्याच नाही तर या 4 रंगांच्याही असतात गाड्यांच्या नंबर प्लेट्स!

Knowldege News : प्रत्येकच्या घरात चारचाकी गाडी (four wheeler) आहे. आपल्या आजूबाजूलाही अनेक टॅक्सी (taxi), ओला (Ola Cabs), उबर (Uber) अशा व्यावसायिक चारचाकी गाड्यादेखील असतात. जेव्हा आपण गाडी घेतो आपल्याला आरटीओमध्ये (RTO) नोंदणी करावी लागते. त्यानंतर आपल्या गाडीला एक नंबर मिळतो. अनेक व्हिआयपी (VIP) लोक एका विशिष्ट नंबराची मागणी देखील करतात त्यासाठी त्यांना अधिक पैसा मोजावा लागतो. ही नंबर प्लेट (number plates) आपल्या गाडीची (car) ओळख असते. या ज्या पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट असतात या आपल्या गाडीच्या उपयोगावर देण्यात येतात. (Trending News General Knowledge News why do vehicles have number plates with different colours in india)

कधी कधी रस्त्यावरून जाताना तुम्हाला काळी किंवा हिरव्या रंगाची नंबर प्लेट दिसली आहे का? त्या कुठल्या गाड्या आहेत याबद्दल  तुम्हाला माहिती आहे का? शिवाय फक्त पांढऱ्या – पिवळ्याच नाही तर या 4 रंगांच्याही असतात गाड्यांच्या नंबर प्लेट्स असतात. आज आपण प्रत्येक रंगाचा अर्थ जाणून घेऊयात. 

हेही वाचा :  काँग्रेसला 2.5 कोटींचा फटका! व्याजासकट वसूल केलं जाणार 39 वर्षांपूर्वीचं 'ते' बिल

लाल नंबर प्लेट

राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या वाहनांवर लाल रंगाची नंबर प्लेट लावली जाते. यामध्ये क्रमांक प्लेट राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ बसवण्यात आले आहे. त्यांच्याकडे नंबर नाहीत, मात्र काही वर्षांपासून अनेक नेत्यांच्या गाड्यांवर नंबर लावण्याचे आदेश आले आहेत. याशिवाय, कार उत्पादक ज्या वाहनांच्या चाचणीसाठी किंवा जाहिरातीसाठी रस्त्यावर उतरतो, त्या वाहनांवर लाल रंगाच्या नंबर प्लेटही लावल्या जातात.

हिरवी नंबर प्लेट

भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर हिरव्या नंबर प्लेट लावल्या जातात. इलेक्ट्रिक कारमध्ये हिरव्या नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगात नंबर लिहिलेले असतात. तर व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांवरील नंबर हे पिवळ्या रंगात लिहिलेले असतात.

 

 

काळी नंबर प्लेट

तुम्ही अनेक वाहनांमध्ये काळी नंबर प्लेट पाहिली असेल, ही देखील व्यावसायिक वाहने आहेत. ज्या गाड्या भाड्याने दिल्या जातात त्यांना काळी प्लेट असते आणि त्यांचे क्रमांक पिवळ्या रंगात लिहिलेले असतात.

निळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स

निळ्या रंगाच्या नंबर प्लेट फक्त दूतावासाशी संलग्न असलेल्या वाहनांवर असतात. परदेशी प्रतिनिधी या निळ्या नंबर प्लेट्सच्या कारमध्ये प्रवास करतात आणि परदेशी राजदूत किंवा मुत्सद्दी त्यांच्या गाडीवर ही प्लेट असते.

हेही वाचा :  Baba Vanga Predictions 2023: कोरोनानंतर नागरीकांना 'या' विणाषकारी समस्या भेडसावणार, बाबा वेंगा यांची भविष्यवाणी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर, आठवीतल्या मुलीचं कॉम्प्युटरपेक्षाही सुंदर अक्षर

World best handwriting: सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असतो असं म्हटलं जात. लहानपणी शाळेत असताना …

‘7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत…’ या करारावर आरोपीची कोर्टातून सुटका, काय आहे नेमकं प्रकरण?

Husband and Wife : कोर्टातील एक आश्चर्यचकित करणार प्रकरण समोर आलंय. न्यायालयात गुन्हेगारी जगतापासून कौटुंबिक …