आताच्या मुलांसमोर नक्की कसं वागायचं हा प्रश्न पडतोय? Sudha Murthy यांच्या पॅरेंटिंग टिप्स नक्कीच मदत करतील

सुधा मूर्ती प्रत्येक काळातील पालकांसाठी प्रेरणादायी ठरतात. सुधा मूर्ती या केवळ एक व्यावसायिक महिला, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ती नाही, तर सुधा मूर्ती आपल्या मुलांचे योग्य संगोपन करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकासाठी एक उत्तम मार्गदर्शक आहे.

अनेक प्रसंगी सुधा मूर्ती यांनी पालकत्वाबद्दल सांगितले आहे. दोन मुलांची आई असल्याने त्यांनी नेहमी आपल्या अनुभवाचा वापर करून इतर पालकांना योग्य दिशेने मार्गदर्शन केले आहे. सुधा मूर्ती यांनी सर्वांसोबत शेअर केलेल्या सर्वोत्तम पालक टिप्स नक्की फॉलो करा. कारण या सगळ्याने तुम्हाला मुलांना सर्वगुण संपन्न बनवण्याकरता मदतच होणार आहे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​तुमच्या मुलांसमोर योग्यच वागा

सुधा मूर्ती यांनी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगितले ते म्हणजे पालकांनी मुलांसमोर योग्यच वागावं. मुलांमध्ये योग्य सवयी रुजवण्यासाठी त्यांनी त्यांच्यासमोर योग्य पद्धतीने वागले पाहिजे. जर तुम्ही रांगेत उभे असाल तर तुम्ही रांग न मोडता संयमाने तुमच्या वेळेची वाट पहावी, जेणेकरून तुमच्या मुलांना हीच सवय लागेल. कारण मुलं तुम्हालाच बघून मोठी होत असतात.

हेही वाचा :  Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी पोस्टर्स, मुंबईतून बाहेर पडण्यास मनाई

(वाचा – रतन टाटा यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिल्या यशाच्या १० Golden Advice)

​मुलांना पैशांची किंमत शिकवा

सुधा मुलगा रोहन मूर्तीला त्याच्या वाढदिवसाची पार्टी पंचतारांकित हॉटेलमध्ये करायची होती. तिने आपल्या मुलाला हे समजावले की भरपूर पैसा असण्याने कोणीही असाधारण बनत नाही. दरवर्षी येणाऱ्या वाढदिवसासारख्या प्रसंगी हजारो खर्च करणे हा शहाणपणाचा निर्णय नाही. म्हणून, तुमचा पैसा तुम्हाला पाहिजे तेथे वापरा, तुम्हाला पाहिजे तसा नाही. पालक म्हणून तुम्ही मुलांसमोर नवा आदर्श उभा करायला हवा.

(वाचा – इशा अंबानीने दिला जुळ्या बाळांना जन्म, नाव जे त्यांच्या कुटुंबाला साजेल असंच…. पाहा नावाचा अर्थ)

​मुलांना हातात गोष्टी देणे टाळा

अनेक पालक मुलांवरच्या अति प्रेमापोटी त्यांना सगळ्या गोष्टी हातात देण्याची सवय लावतात. सुधा मूर्ती ही सवय अत्यंत चुकीची असल्याचं म्हणतात. सुधा मूर्ती यांनी मुलांना स्पेस देण्याबद्दल सांगितलं आहे. जर त्यांना भूक लागली आणि मुलं थोडी मोठी असतील तर त्यांना उठून स्वतःहून जेवण घेऊ दे. अभ्यास कर, आता खेळायला जा किंवा आता लगेच झोपून घे यासारख्या सूचना मुलांना करू नका. या मुलांना प्रेमाने वाढवा त्यांना मोकळा स्पेस द्या.

हेही वाचा :  प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे एक समजूदार पुरुष असतो - सुधा मूर्तीं

(वाचा – ‘ही’ एक टेस्ट गरोदर राहण्यास करेल मदत, अनेक महिलांना झालाय याचा फायदा)

​मुलांसमोर स्वतःचाच चांगला आदर्श ठेवा

पालक अनेकदा त्यांच्या मुलांना वाचायला, नवीन गोष्टी शिकायला, खेळात गुंतवून ठेवायला, अभ्यासात उत्कृष्ट बनवायला, इत्यादी भाग पाडतात. मुलांवर गोष्टींची सक्ती करण्याऐवजी, पालकांनी त्यांना मोकळीक दिली पाहिजे. आणि त्यांना काय आवडते ते निवडा. त्याचबरोबर त्यांना वाचनाची गोडी लागावी असे वाटत असेल तर त्यांच्यासमोर एखादे पुस्तक वाचा म्हणजे त्यांना त्यांच्या पालकांकडून ती सवय लागली.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

​मुलांसमोर गॅजेट टाळा

मोबाइल, टॅब आणि इतर गॅजेटचं महत्व खूप आहे. पण ही आपली सोय आहे. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर चांगला आदर्श ठेवायला हवा. यासाठी तुम्ही मुलांना घराबाहेरचं जग दाखवा. गार्डन, झू किंवा मैदानी खेळ या सगळ्याच महत्व मुलांना समजावून सांगा. गॅजेट ही तुमची सोय आहे पण तुम्ही त्यावर अवलंबून न राहता योग्य वेळी वापरण्याची शिस्त मुलांना लावायला हवी.

(वाचा – आइंस्टाइन आणि स्टीफन हॉकिंगपेक्षाही या मुलाचा IQ एकदम भारी, जाणून घ्या या ११ वर्षाच्या मुलाबद्दल)

हेही वाचा :  पाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरण

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …