SBI Internet Banking वापरणाऱ्यांनो लक्ष द्या, ‘या’ चुकांची मोजावी लागेल मोठी किंमत, असे राहा सेफ

नवी दिल्ली: SBI Users: देशातील सर्वात मोठ्या बँकिंग प्रणालीवर हॅकिंगचा धोका वाढला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, एसबीआय ऑनलाइन किंवा SBI UPI बँकिंग वापरणाऱ्यांसाठी हा धोका अधिक आहे. ड्रिनिक व्हायरस आयडेंटिफाय करण्यात आला असून इतर बँकिंग ट्रोजन प्रमाणे, Drinik देखील एक एक्सेसिबिलिटी ट्रोजन आहे, जो विशेषतः SBI इंटरनेट बँकिंग आणि SBI UPI पेमेंट युजर्सना लक्ष्य करत आहे. अशात तुमचे अकाउंट सुरक्षित राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर, SBI ऑनलाइन बँकिंग करताना सायबर सुरक्षा तज्ञ प्रिया सांखला यांनी सांगितलेल्या या ६ गोष्टींची काळजी घ्या.

वाचा: मस्तच! OnePlus 10T 5G च्या किंमतीत ५००० रुपयांची कपात, फोन फक्त १९ मिनिटांत होतो पूर्ण चार्ज

SBI युजर्सना कसे लक्ष्य करते?

ड्रिनिक व्हायरस मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर हॅकर्सना अनेक गोष्टींचा अॅक्सेस मिळतो. यामध्ये मालवेअर कॉल लॉग आणि एसएमएस वाचणे आणि पाठवणे समाविष्ट आहे. याशिवाय, या व्हायरसला तुमच्या स्टोअरचा डेटा वाचण्याची आणि वापरण्याची परवानगी मिळते. अशा प्रकारे, ते तुमच्या डिव्हाइसचे नियंत्रण घेते. हा व्हायरस बायोमेट्रिक पिन आणि कीस्ट्रोकचे तपशील मिळवण्यात माहिर आहे.

हेही वाचा :  फोनमधील महत्वाचा Data Leak होण्याची भीती वाटतेय ? या चुका टाळा, डिव्हाइस राहील नेहमी सेफ

वाचा: हैद्राबादसह ‘या’ शहरात Jio TRUE 5G लाँच, यूजर्सना मिळणार १ Gbps पर्यंत जबरदस्त स्पीड

ड्रिनिक व्हायरसपासून सेफ राहण्यासाठी फॉलो करा टिप्स.:

पेमेंटसाठी एसएमएसद्वारे प्राप्त झालेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. सरकार कोणत्याही प्रकारच्या परताव्यासाठी कोणताही एसएमएस पाठवत नाही. कोणत्याही अॅपमध्ये मोबाईल पेमेंट पिन टाकू नका. ऑनलाइन पेमेंटसाठी अॅपऐवजी संगणकावर वेबसाइट वापरणे चांगले.

इन्कम टॅक्स अॅप्स इन्स्टॉल करणे टाळा:

बँकिंग अॅप्स, इन्कम टॅक्स अॅप्स इन्स्टॉल करणे टाळा आणि मोबाईल नोटवर किंवा गॅलरीत फोटोवर पासवर्ड, बँकेचा ग्राहक आयडी सेव्ह करू नका.
डायरेक्ट बँकिंग अॅप वापरण्याऐवजी, मोबाइलवरून ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी मर्यादा असलेले डिजिटल वॉलेट हा एक चांगला मार्ग आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये कोणतेही मालवेअर इन्स्टॉल झाले तर, तुम्ही तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे गमावणार नाही.

वाचा: Airtel, Jio, Vodafone-idea युजर्स ‘या’ टॉप प्लान्सवर एक नजर टाका, मिळतात अनेक फायदे

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …