Vikas Divyakirti: सीता मातेबाबत माजी IAS अधिकाऱ्याचे वादग्रस्त वक्तव्य? व्हायरल व्हिडीओवरुन नवा वाद

देशातील लोकप्रिय शिक्षकांमध्ये गणले जाणारे आयएएस अधिकारी डॉ. विकास दिव्यकीर्ती (Vikas Divyakirti) यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. कोचिंग इन्स्टिट्यूट दृष्टी आयएएस (Drishti IAS) वर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावर (Social Media) होत आहे. यासोबत #BanDrishtiIAS हा हॅशटॅगही टेंड्र होत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विकास दिव्यकीर्ती यांच्यावर टीका होत आहे. (Controversy over Vikas Divyakirti remark on Lord Ram and Goddess Sita Debate broke out on social media)

सीता मातेचा अपमान केल्याचा दावा

या कथित व्हायरल व्हिडिओमध्ये विकास दिव्यकीर्ती हे भगवान राम (shri ram) आणि देवी सीता (Sita) यांच्याबद्दल बोलत आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर मोठी सुरु झाला आहे. विकास दिव्यकीर्ती यांनी भगवान राम आणि देवी सीता यांचा अपमान केला आहे असे टीका करणाऱ्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अनेक लोक दिव्यकीर्ती यांचे समर्थन करत आहेत.  दिव्यकीर्ती यांचा फक्त काही सेकंदांचा व्हिडिओ मुद्दाम शेअर केला जात आहे आणि त्यांनी जे सांगितले आहे ते शास्त्रात लिहिलेले आहे, असे समर्थकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :  Today Gold Silver Price : नवरात्रीच्या दिवसात स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या एका क्लिकवर आज किती स्वस्त झाले सोने?

साध्वी प्राचींनी शेअर केला व्हिडीओ

राष्ट्रीय सेविका समितीच्या सदस्या साध्वी प्राची यांनी ट्विटरवर BanDrishtiIAS या हॅशटॅगसह हा व्हिडिओ शेअर केला आहे. प्राची यांनी शेअर केलेला व्हिडिओ केवळ 45 सेकंदांचा आहे. यामध्ये दिव्यकीर्ती रामायणातील एका घटनेबद्दल बोलताना ऐकू येत आहेत.

पाहा व्हिडीओ –

दिव्यकीर्ती यांच्या या कथित वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. काहींनी तर हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल कोचिंग इन्स्टिट्यूटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून ट्विटरवर #BanDrishtiIAS ट्रेंड करत आहे. मात्र काही विद्यार्थ्यांनी दिव्यकीर्ती यांच्या समर्थनार्थ पुढे येऊन #ISupportDrishtiIAS हा ट्रेंड सुरू केला आहे. एका ट्विटर युजरने त्यांचा विधानाचा संपूर्ण व्हिडिओ पोस्ट करत, “तुम्हाला #BanDrishtiIAS करायचे असल्यास, विकास दिव्यकीर्ती यांचे विधान चुकीचे असल्याचे सिद्ध करा,” असे म्हटले आहे. तसेच काही लोकांनी असाही दावा केला आहे की व्हिडिओमध्ये ते जे काही बोलले आहेत ते खरे आणि प्राचीन धर्मग्रंथातील विधान आहे.

दरम्यान, डॉ. विकास दिव्यकीर्ती यांनी दिल्ली विद्यापीठात शिक्षक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. 1996 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली. ते आयएएस अधिकारी झाले आणि त्यांची गृह मंत्रालयात नियुक्ती झाली. मात्र, त्यांना ते काम आवडले नाही. अवघ्या वर्षभरानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि 1999 मध्ये त्यांनी दृष्टी आयएएस कोचिंग इन्स्टिट्यूटची सुरुवात केली.

हेही वाचा :  पाकिस्तानी युट्युबर भारतात फिरायला आला, हायवेवर अचानक संपलं पेट्रोल अन्...; पाहा Video



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझा गत जन्म बंगालमध्ये झाला होता…’ पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?

Loksabha 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान (Second Phase Voting) पार पडतंय. देशभरातील …

‘म्हातारं लय खडूस,’ सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका, ‘अजित पवार किल्लीला लोंबकळत…’

Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, नेत्यांकडून एकमेकांवर …