दूध पिऊन व कॅल्शियम पदार्थ खाऊन होणार नाही हाडं मजबूत

हाडे शरीराला आधार किंवा सपोर्ट देतात. ज्याच्या मदतीने आपण हातपाय सहजपणे हलवू शकता. अशा परिस्थितीत, या हाडांच्या कमकुवतपणामुळे किंवा ठिसूळ झाल्यामुळे (Weak Bones) संपूर्ण दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो. वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होणे हे सामान्य आहे. ही प्रक्रिया टाळणे शक्य नसले तरी ती काही काळ स्लो किंवा थांबवता येऊ शकते.

हाडांसाठी कॅल्शियम (Calcium for bones) हे आवश्यक पोषक तत्व आहे. जे दूध, हिरव्या भाज्या, सोयाबीन इत्यादी दुग्धजन्य पदार्थांमधून नैसर्गिकरित्या मिळू शकते. पण, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात असेल. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा काय संबंध आहे आणि त्यांची कमतरता कशी भरून काढता येईल ते जाणून घेऊया.

कॅल्शियम + व्हिटॅमिन डी = स्ट्रॉंग बोन्स

Webmd नुसार, व्हिटॅमिन डी कॅल्शियमसोबत मिळून काम करते. व्हिटॅमिन डी शिवाय तुमचे शरीर अन्नातील कॅल्शियम शोषून घेण्यास असमर्थ असते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात नवीन आणि मजबूत हाडे तयार होण्यास अडथळा येतो. ब्लड टेस्ट तुम्हाला तुमच्या व्हिटॅमिन डी च्या पातळीबद्दल सांगू शकते. प्रौढांसाठी सामान्य व्हिटॅमिन डी पातळी 20 एनजी/एमएल पेक्षा जास्त किंवा एवढीच असणं गरजेचं असतं तर 12 ng/ml पेक्षा कमी लेव्हल असणं म्हणजे तुमच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे हे समजून जा.

हेही वाचा :  गळ्याला दुपट्टा गुंडाळून 16 वर्षांची मुलगी करत होती स्टंट, तितक्यात पकड घट्ट झाली अन्...

(वाचा :- विराट कोहली, मलायका अरोरासारख्या सुपरफिट लोकांच्या दीर्घायुषाचे रहस्य आहे हे खास पाणी, कधीच पित नाहीत साधं पाणी)

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे काय होतं?

कॅल्शियममुळे तुमची हाडे मजबूत होतात. जेव्हा कॅल्शियमची पातळी कमी होते, तेव्हा शरीर आपल्या हाडांमधून ते शोषून घेण्यास सुरुवात करते. हाडांचे जास्त नुकसान झाल्यास ऑस्टिओपोरोसिस किंवा ठिसूळ हाडांचे आजार (Brittle Bone Disease) होऊ शकतात. यामुळे हाडे सहजपणे तुटण्याची शक्यता वाढते.

(वाचा :- वाढत्या प्रदूषणाने फुफ्फुसाचे भंयकर आजार, फुफ्फुसे निकामी होऊ नये म्हणून घरबसल्या शरीरातून अशी काढा घाणेरडी हवा)

कॅल्शियम किती प्रमाणात असते गरजेचे

वयाच्या 50 व्या वर्षी, हाडांची झीज टाळण्यासाठी तुम्हाला दररोज सुमारे 1,200 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. परंतु तुम्हाला 9 ते 18 या वयादरम्यान दररोज 1,300 मिलीग्राम आणि अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते, जे वृद्धापकाळात हाडांची दीर्घकालीन झीज थांबवण्याचे काम करते.

(वाचा :- रॉकेट स्पीडने पसरतोय RSV Virus, डोळे, नाक, तोंडातून घुसून दाखवतो ही 11 भयंकर लक्षणं, मुलं व वृद्धांसाठी जीवघेणा)

कॅल्शियमसाठी खा हे पदार्थ

NHS च्या मते, दूध, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ हिरव्या पालेभाज्या – जसे की कर्ली केल, भेंडी पण पालक नाही (पालकामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते पण शरीर ते पचवू शकत नाही) आणि सोया कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. याशिवाय माशांमध्ये विशेषतः सार्डिनमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते.

हेही वाचा :  कुकरमधून कधीच फसफसून येणार नाही पाणी बाहेर, फॉलो करा या टिप्स

(वाचा :- भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने Olympics Gold Medal जिंकल्यावर केली 1 मोठी चूक, हाताबाहेर गेलेलं वजन असं केलं कमी)

हे पदार्थ खाऊन करा व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर

सूर्याच्या किरणांमध्ये व्हिटॅमिन डी असते. म्हणूनच याला सनशाईन व्हिटॅमिन असेही म्हणतात. अशा परिस्थितीत काही मिनिटे उन्हात राहिल्याने शरीराला ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. व्हिटॅमिन डी अन्नपदार्थातून देखील मिळू शकते. यासाठी तुम्ही मशरूम, अंडी, लाल मांस, ऑइली फिश, दूध, संत्री यासारखे पदार्थ खाऊ शकता.

(वाचा :- Diabetes Symptoms On Hand : हातांत ही 12 लक्षणे दिसली तर समजून जा झालाय डायबिटीज, ब्लड शुगर वाढताच दिसतात या खुणा)

हाडे मजबूत होण्यासाठी घ्या ही काळजी

नियमित व्यायामामुळे स्नायू तयार होतात, ज्यामुळे हाडे तुटण्यास अडथळा होतो. तसेच, जर तुम्हाला वृद्धापकाळात कमकुवत हाडांच्या समस्येचा सामना करायचा नसेल, तर आतापासून सिगारेट आणि अल्कोहोलचे सेवन बंद करा किंवा अगदी कमी प्रमाणात करा. याशिवाय साखरेच्या ड्रिंक्सपासून दूर राहा.

(वाचा :- किचनमधील या गोष्टी ठरतात किडनी, ह्रदय, मेंदू खराब होण्यास जबाबदार, घरचं जेवण खाऊनही पडत असाल सतत आजारी तर सावधान)

हेही वाचा :  Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची मोठी भूमिका

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल

Monsoon in Maharashtra: महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत. खासकरुन मुंबई, पुणे सारख्या …

पुण्यात भरधाव स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; नागरिकांनी बिल्डरच्या मुलाला दिला चोप

पुण्यातील उच्चभ्रू कल्याणीनगर परिसरात स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक तरुण …