‘आप’ने या 5 जणांची राज्यसभेसाठी का निवड केली, अधिक जाणून घ्या

चंदीगड : पंजाबमध्ये AAPने स्वबळावर सरकार स्थापन केले आहे. आता आम आदमी पक्षाने (AAP) राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’ने 92 जागा जिंकल्या आहेत. या मोठ्या विजयानंतर आता पंजाब कोट्यातून आम आदमी पार्टी क्रिकेटपटू हरभजन सिंह  (Harbhajan Singh), राघव चढ्ढा (Raghav Chadha), डॉ. संदीप पाठक (Dr Sandeep Pathak), अशोक मित्तल (Ashok Mittal) आणि संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांना राज्यसभेवर पाठवणार आहे.

पक्षाने सस्पेन्स संपला

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हरभजन सिंह याचे नाव चर्चेत होते, मात्र बाकीच्या नावांबाबत संभ्रम होता. वास्तविक, पंजाबमधील 7 पैकी 5 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपत आहे. यावेळच्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 117 पैकी 92 जागा जिंकल्या आहेत. अशा स्थितीत राज्यातील राज्यसभेच्या 7 पैकी 6 जागा ‘आप’च्या खात्यात जातील, असे मानले जात आहे. सुखदेव सिंह, प्रताप सिंह बाजवा, श्वेत मलिक, नरेश गुजराल आणि शमशेर सिंह दुल्लो हे 5 राज्यसभा सदस्यांपैकी आहेत ज्यांचा कार्यकाळ पंजाबमध्ये एप्रिलमध्ये संपत आहे.

हेही वाचा :  नारळी पौर्णिमा आणि समुद्राचं काय नातं? समजून घ्या या सणाचा अर्थ आणि त्यामागचं खरं कारण

'आप'ने या 5 जणांची राज्यसभेसाठी का निवड केली, अधिक जाणून घ्या

AAP चे उमेदवार कोण आहे ते जाणून घ्या

तसेच ‘आप’ने लव्हली विद्यापीठाचे कुलपती अशोक कुमार मित्तल यांचे नाव फायनल केले आहे. अशोक मित्तल हे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आहेत. अशोक मित्तल हे शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील कार्यासाठी ओळखले जातात. एका सामान्य कुटुंबातून आलेले, अशोक मित्तल यांनी समाजाची आणि पंजाबची सेवा करण्यासाठी LPU ची स्थापना केली होती आणि स्वतःच्या बळावर यश मिळवले होते. त्याचवेळी पाचवे उमेदवार म्हणून संजीव अरोरा यांचे नाव पुढे आले आहे.

प्रसिद्ध क्रिकेटपटू हरभजन सिंह याच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्याचबरोबर राघव चढ्ढा हा देखील दिल्लीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. ते जल बोर्डाचे उपाध्यक्षही आहेत. सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी राघव चढ्ढा चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करायचे. राघव चढ्ढा सध्या दिल्ली विधानसभेच्या राजेंद्र नगर मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे राघव चड्डा यांना राज्यसभेवर जाण्यासाठी आपली जागा सोडावी लागणार आहे.

कोण आहे संदीप पाठक?

डॉ. संदीप पाठक हे आयआयटी दिल्लीतील भौतिकशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक आहेत. संदीप पाठक यांना बुथ स्तरापर्यंत संघटन करण्यात नैपुण्य आहे. यापूर्वी 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत डॉ. संदीप पाठक यांनी आम आदमी पार्टीसाठी काम केले होते. संदीप हा छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यातील लोर्मी येथील रहिवासी आहे. संदीपचे कुटुंब आजही बाठा गावात राहते.

हेही वाचा :  कारसेवक ते बालरोगतज्ज्ञ... भाजपने राज्यसभेसाठी रिंगणात उतरवलेले डॉ. अजित गोपछडे कोण आहेत?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …