पिंपरीत रंग लावण्याचा बहाण्याने सराईत गुन्हेगाराने केला विनयभंग | While celebrating Holi a woman and her minor daughter were molested by a criminal in Pimpri msr 87 kjp 91


हा सराईत गुन्हेगार कोयता घेऊन परिसरात देखील फिरत होता

राज्यभरात होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दोन वर्षानंतर हे उत्सव साजरे करण्याची संधी नागरिकांना मिळाली. मात्र याला गालबोट लागल्याची घटना चिंचवडमध्ये घडली आहे. एका सराईत गुन्हेगारांने रंग लावण्याचा बहाण्याने माय लेकीचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वैभव माने याला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने चिंचवडच्या रामनगर परिसरात हातात कोयता घेऊन दहशत पसरविली होती. या प्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलिसात तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिची आई हे घराच्या समोरील ओट्यावर रंग खेळत होत्या. बेसावध असलेल्या दोघींना पाहून आरोपीने अगोदर आईला मिठी मारून रंग लावण्याचा प्रयत्न केला. हे पाहून अल्पवयीन मुलगी घाबरून घरात पळून गेली. परंतु, आरोपी घरात शिरला आणि तिचाही विनयभंग केला असे तक्रारीत म्हटल आहे.

दरम्यान, पीडित तक्रारदार महिलेच्या पतीने आरोपी वैभवला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली गेली. या प्रकरणानंतर रामनगर परिसरात आरोपीने हातात कोयता घेऊन दहशत पसरविली होती. या प्रकरणी आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. एकीकडे आयर्नमॅन म्हणून ओळख असलेले कृष्ण प्रकाश हे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आहेत. गुन्हेगारीमुक्त पिंपरी-चिंचवड शहर हे त्यांचं स्वप्न आहे. परंतु, नेहमी चर्चेत आणि प्रकाशझोतात असणारे पोलीस आयुक्त कुठेतरी कमी पडतायेत अशी चर्चा आता सर्वसामन्यांमध्ये रंगली आहे.

हेही वाचा :  Personal Loan घेण्यापेक्षा हे पर्याय सर्वात उत्तम, तुलनेत EMI असेल कमी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …