12 cases of corona infection detected in pune and pimpri chinchwad zws 70 | दोन वर्षांतील सर्वात कमी रुग्णसंख्या ; संसर्गाचा दरही १ टक्क्यांखाली


जिल्ह्यातील २७ जणांना शुक्रवारी करोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या १४ लाख ५३ हजार ३४५ एवढी झाली आहे.

पुणे : शहर आणि जिल्ह्यात करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीनंतर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी प्रथमच सर्वात कमी रुग्णसंख्या आढळून आली.  पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात करोना संसर्गाचे प्रत्येकी बारा रुग्ण आढळून आले. तर ग्रामीण भागात तीन असे जिल्ह्यात एकूण २७ नवे रुग्ण आढळून आले.

शहरात झालेल्या करोना संसर्ग चाचण्यांची संख्या पहाता संसर्गाचा दर १ टक्क्यांखाली आला असून शुक्रवारी तो ०.५७ टक्के नोंदविण्यात आला.

जिल्ह्यातील २७ जणांना शुक्रवारी करोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या १४ लाख ५३ हजार ३४५ एवढी झाली आहे. सलग अकराव्या दिवशी  जिल्ह्यात शून्य मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. करोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १९ हजार ६८२ वर कायम राहिली आहे.

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ४ हजार ७५५ चाचण्या करण्यात आल्या, त्यांपैकी २ हजार ९९ चाचण्या पुणे शहरात झाल्या. त्यामुळे शहरात ०.५७ टक्के आणि जिल्ह्यात ०.५० टक्के संसर्गाचा दर नोंदवण्यात आला. दिवसभरात आढळलेल्या २७ नवीन रुग्णांपैकी प्रत्येकी १२ रुग्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील,  तर ३ रुग्ण उर्वरित ग्रामीण भागातील आहेत.  पुणे शहरातील ४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे शहरातील करोनामुक्त रुग्णांची संख्या ६ लाख ५२ हजार १३२ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील ३४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

हेही वाचा :  1 एप्रिलपासून बदलणार हे मोठे आर्थिक नियम; सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम

* पुणे – १२ नवे रुग्ण, शून्य मृत्यू

* पिंपरी-चिंचवड – १२ नवे रुग्ण, शून्य मृत्यू

* ग्रामीण भाग – ३ नवे रुग्ण, शून्य मृत्यू



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …