अमेरिकेने इशारा दिल्यानंतरही भारत रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या तयारीत; ३५ लाख बॅरल तेल विकत घेणार – सूत्र | India to go through oil deal with Russia soon for 3.5 million barrels crude oil sgy 87


भारत आणि अमेरिकेमधील संबंध बिघडणार?

Russia Ukraine Conflict: रशियाने भारताला स्वस्तात कच्चं तेल विकण्यासाठी प्रस्ताव ठेवला असून मोदी सरकार ३५ लाख बॅरल तेल विकत घेण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. महत्वाचं म्हणजे हा करार झाल्यास तेलाची आयात तसंच विमा ही सर्व जबाबदारी रशिया घेणार आहे. दुसरीकडे रशियाने भारताला स्वस्तात कच्चं तेलं उपलब्ध करुन देण्याचा प्रस्वात दिल्यानंतर अमेरिकेने भारताला इतिहासात चुकीच्या बाजूला उभे होतात याची नोंद होईल असा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

भारताने रशिया-युक्रेन वादात कोणतीही भूमिका घेण्यास नकार दिला असून चर्चेच्या माध्यमातून हा वाद सोडवला जावा असं सांगितलं आहे. दुसरीकडे रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं असतानाच अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध लावले आहेत. यादरम्यान भारताचा मित्र असलेल्या रशियाने स्वस्तात कच्चं तेल देण्याचा प्रस्ताव ठेवला असून याकडेही संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

भारत रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेण्याचा विचार करत असतानाच अमेरिकेचा इशारा; म्हणाले, “विनाशकारी परिणाम…”

हेही वाचा :  रात्रीच्या अंधारात पत्नी प्रियकराला भेटली, पतीला कळताच त्याने घेतला वेगळाच निर्णय

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी सोमवारी राज्यसभेत बोलताना रशियाच्या प्रस्तावावर विचार सुरु असल्याचं सांगितलं होतं. भारताने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नसून सूत्रांच्या माहितीप्रमाणे भारत हा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता आहे.

रशियाने भारताला स्वस्तात कच्चं तेलं उपलब्ध करुन देण्याचा प्रस्वात दिल्यानंतर अमेरिकेने यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताकडून अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांचं उल्लंघन होणार नाही, मात्र भारताने असं पाऊल उचलल्यास जगातील सर्वात मोठी लोकशाही चुकीच्या बाजूने होती अशी इतिहासात नोंद होईल असं अमेरिकेने म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केलं आहे. तज्ज्ञांच्या मते हा प्रस्ताव भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये मोठा बदल घडवू शकतो.

हेही वाचा :  पाकिस्तानात गेलेली अंजू 6 महिन्यांनंतर भारतात परतली, पती अरविंद स्विकार करणार?

अमेरिकेने काय म्हटलं आहे?

कच्चं तेल स्वस्तात देण्याच्या रशियाचा प्रस्ताव भारताकडून स्वीकारला जाण्याच्या शक्यतेवर बोलताना जेन साकी यांनी म्हटलं की, “मला वाटत नाही यामुळे अमेरिकेच्या निर्बंधांचं उल्लंघन होईल, पण आपण कुठे उभं राहू इच्छितो याचा त्यांनी विचार करायला हवा”. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “सध्या जेव्हा इतिहासाची पुस्तकं लिहिली जात असतील तेव्हा तुम्हाला आपलं स्थान नेमकं कुठे हवं आहे? रशिया किंवा रशियन नेतृत्वाचं समर्थन म्हणजे नक्कीच आक्रमणाचं समर्थन आहे ज्याचा परिणाम विनाशकारी आहे”.

काय आहे रशियाची ऑफर ?

अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांनी रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करणं बंद केलं आहे. याशिवाय रशियावर अनेक नवे निर्बंध लावले आहेत. या सर्व गोष्टींमुळे रशियाचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. हे पाहता रशियाने भारताला स्वस्तात कच्चं तेलं तसंच इतर गोष्टी उपलब्ध करुन देण्यासंबंधी सांगितलं आहे. भारताने अद्याप या प्रस्तावावर कोणतंही उत्तर दिलेलं नाही. पण भारत हा प्रस्ताव स्वीकारणार असल्याची चर्चा सुरु आहे.

काय आहे फायदा आणि नुकसान ?

जर भारताने हा प्रस्ताव स्वीकारला तर महागाईपासून मोठा दिलासा मिळू शकतो. सध्या कच्च्या तेलाची किंमत जास्त असल्याने पेट्रोल आणि डिझेलच नाही तर इतर गोष्टींच्या किंमतीही वेगाने वाढत आहेत. जर भारताला तेल स्वस्त मिळालं तर इतर गोष्टीही स्वस्त होतील. दरम्यान हा प्रस्ताव स्वीकारल्यास त्याचे तोटेही आहेत. अमेरिकेसह जगातील इतर देशांनी रशियावर निर्बंध लावले असून त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली असताना भारताने हा प्रस्ताव स्वीकारल्यास या देशांसोबत भविष्यात व्यापार करणं तसंच संबंठ ठेवणं भारताला फार कठीण पडू शकतं.

हेही वाचा :  "लव जिहाद करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणारे 'हे' लाभ ताबडतोब थांबवा"



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजारच्यांचा दारात जाऊन आईने वाजवला ढोल… Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण …

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …