51 व्या वर्षी Manoj Tiwari होणार बाबा, मात्र चाळीशीनंतर फॅमिली प्लानिंग करणं योग्य आहे, जाणून घ्या तज्ञांच मत

भोजपुरी सुपरस्टार आणि भाजपचे मंत्री मनोज तिवारी 51 व्या वर्षी बाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वी मनोत तिवारी यांच्या पत्नी सुरभि तिवारी यांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या सगळ्या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 51 व्या वर्षी वडिल होणाऱ्या मनोज तिवारी यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अगोदर शाहरूख खान, मनोज बाजपेयी, सैफ अली खान, संजय दत्त सारखे अनेक सुपरस्टार चाळीशीनंतर बाबा झाले आहेत.

मात्र मेडिकलनुसार ४० ते ५० वयात फॅमिली प्लानिंग योग्य आहे का? याबाबत गायनेकोलॉजिस्टसोबत चर्चा केली. जर तुम्ही वयाच्या चाळीशीनंतर बाळाला जन्म देण्याचा विचार करत असाल तर एक्सपर्ट यासगळ्याबाबत काय म्हणतात ते जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​अधिक वयात बाप होण्याचा निर्णय योग्य

डॉ स्नेहा साठे, वंध्यत्व निवारण तज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदृढ बाळ जन्माला यावे याकरिता स्त्रीप्रमाणेच पुरूषांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची असते. वाढत्या वयाबरोबर टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन पुरूषांमध्ये शुक्राणूंच्या निर्मितीत मदत करतात. त्यामुळे स्त्रियांप्रमाणेच पुरूषांनीही वाढत्या वयाकडे लक्ष देणं गरजेचे आहे. ४५ वर्षानंतर शुक्राणूंचा दर्जा देखील खालावतो. वाढत्या वयानुसार शुक्राणूंची मोबिलिटीदेखील कमजोर होते. तसेच स्पर्मची संख्या, स्पर्मचा आकार आणि स्पर्मची गती यावरही त्याचा परिणाम होतो.

हेही वाचा :  नाद खुळा Video: गणरायासमोर जगप्रसिद्ध ड्रमरची पुणेकर ढोल-ताशा पथकाबरोबर जुगलंबदी; एकदा पाहाच

बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की 45 ते 54 वयोगटातील पुरुषांच्या बाळांना 25 ते 34 वयोगटातील पुरुषांपेक्षा अकाली जन्म आणि कमी वजनाचा धोका 14% जास्त असतो. यासोबतच मुलांमध्ये मानसिक आजाराचा धोकाही जास्त असतो.

(वाचा – Weight Loss Drink: पोटावरची लटकणारी चरबी एका झटक्यात करेल कमी ‘हे’ ड्रिंक्स, केस गळणे डायबिटीज कंट्रोलमध्ये)

​उशिरा वडिल होण्याचे दुष्परिणाम

वयानुसार पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचा डीएनएवरही परिणाम होतो. कमी दर्जाच्या शुक्राणूमुळे वंध्यत्व तसेच गर्भपात होऊ शकतो. याव्यतिरिक्त, वृद्ध पितृत्वामुळे संततीमध्ये हिमोफिलिया, बौनेपणा आणि प्रोजेरिया यासारख्या दुर्बल रोगांचा धोका वाढतो.

(वाचा – सतत सर्दी होतेय तर आहारात 3 मसाल्यांचा आवर्जून करा समावेश, हृदयाचे आजार-हाय ब्लड शुगरसह १० आजार होतील हद्दपार))

​पुरुषांचे वडील होण्यासाठी योग्य वय काय

तज्ञांनी शिफारस केली आहे की 20 च्या दशकाच्या उत्तरार्धात ते 30 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातला पुरुष पितृत्वासाठी सर्वात अनुकूल आहे. पुरुषां

(वाचा – Weight Loss Story: जेवणातले हे दोन पदार्थ वगळून पुणेकर तरूणाने ७ महिन्यात घटवलं ३८ किलो वजन)

हेही वाचा :  मनोज तिवारी तिसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीच्या बेबी शॉवरचा व्हिडीओ केला शेअर

​चाळीशीनंतर कुटुंब नियोजन करताना ही गोष्ट लक्षात ठेवा

तुम्ही वयाच्या 40 नंतर वडील बनण्याचा विचार करत असाल तर तुमच्या डॉक्टरांशी, प्रजननक्षम एंडोक्राइनोलॉजिस्टशी आणि तुमच्या पत्नीच्या ओबीजीवायएनशी बोला. या वयात तुम्ही निरोगी बाळाला जन्म देण्यास पात्र आहात की नाही हे जाणून घ्या.

(वाचा – दररोज ग्रीन टी पिताना त्याच्या फायद्यांसोबतच नुकसानही जाणून घ्या, कळत नकळत शरीरावर होतो ‘हा’ परिणाम))

​मुलांना या आजारांचा धोका

Webmd नुसार, गेल्या 4 दशकांमध्ये, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये पितृत्व वाढले आहे. ज्यानंतर संशोधकांनी वडिलांच्या वयाचा त्यांच्या न जन्मलेल्या मुलांवर काय परिणाम होतो हे शोधण्यास सुरुवात केली आहे, तेव्हा असे आढळून आले की वडिलांच्या वयामुळे मुलांमध्ये ऑटिझम, स्किझोफ्रेनिया, एपिलेप्सी, बायपोलर, जनुकीय विकार होण्याचा धोका असतो.

(वाचा – फक्त ‘ही’ एक सवय लावून घ्या आणि एक्सरसाइज विसरा, काहीच न करता मिळतील वर्कआऊटचे फायदे)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …