14 गडी, 11 जागा…! विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार? कुणाच्या आमदारांवर कुणाचा डोळा?

Maharastra Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला होणाऱ्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. कारण 11 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकूण 14 उमेदवार रिंगणात उतरलेत. या 14 उमेदवारांपैकी नेमका कुणाचा गेम होणार याची चर्चा सुरू झालीय. संख्याबळापेक्षा महाविकास आघाडीनं एक जादा उमेदवार उतरवल्यानं रंगत निर्माण झालीय. या निवडणुकीत विधानसभेचे 274 आमदार मतदान करणार आहेत. त्यामुळे विजयासाठी एका उमेदवाराला 23 मतांचा कोटा असणार आहे.

14 गडी, 11 जागा, गेम कुणाचा? 

महायुती संख्याबळ – 197 आमदार
भाजप – 103 आमदार
शिवसेना शिंदे गट – 38 आमदार
राष्ट्रवादी AP  – 40 आमदार
जनसुराज्य – 1 आमदार
रासप – 1 आमदार
मनसे – 1 आमदार
अपक्ष – 13 आमदार

महायुतीनं 9 उमेदवार रिंगणात उतरवलेत. पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे भाजपचे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना तिकीट देण्यात आलंय. तर अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना तिकीट निश्चित करण्यात आलंय.

हेही वाचा :  Jio 5G: फोनमध्ये ON करा या सेटिंग, तात्काळ मिळेल 5G Service

मविआचं संख्याबळ – 69 आमदार 
काँग्रेस – 37 आमदार
शिवसेना ठाकरे गट –  15 + 1 आमदार
राष्ट्रवादी SP – 12 आमदार
समाजवादी पार्टी – 2 आमदार
माकप – 1 आमदार
शेकाप – 1 आमदार

माविआनं मैदानात उतरवलेले 3 उमेदवार कोण?
काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिलीये. तर शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिलीये. त्याचबरोबर शेकापने जयंत पाटील यांना उमेदवारी दिलीये.

यासोबतच छोट्या पक्षांचे आमदार कुणाला मतदान करणार यावरही या निवडणुकीचा निकाल फिरण्याची शक्यता आहे. इतर पक्षांचं किती संख्याबळ आहे त्यावर एक नजर टाकुया.

एमआयएमचे 2 आमदार आहेत. तर प्रहार (बच्चू कडू) यांचे 2 आमदार.. बविआचे 3 आमदार तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 1 आमदार.. इतर पक्षांचं संख्याबळ 8 आहे, त्यामुळे ही मतं निर्णयक ठरू शकतात.

दरम्यान, संख्याळानुसार प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार दिले असते तर निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र 11 जागांसाठी 14 उमेदवार दिल्यानं मतं फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे या सगळ्या मातब्बर उमेदवारांमध्ये पराभूत होणारा बारावा उमेदवार कोण असेल याचीच चर्चा सुरू झालीय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : बीड मधील पंकजा मुंडेंचा पराभव कोणामुळे? मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले…

Manoj Jarange On Pankaja Munde : लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव …

सरकार भुजबळांना गप्प का बसवत नाही? मनोज जरांगेचा सवाल, ‘जातीयवाद संपवायचा असेल तर…’

Manoj Jarange on Chhagan Bujbal: छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत का? …