तुमचा iPhone स्लो झालाय? 'या' पाच सोप्या ट्रिक्स फॉलो करुन फोनला पुन्हा करा सुपरफास्ट

Apple iPhone tips and tricks :ॲपलचे आयफोन म्हणजेच प्रीमियम स्मार्टफोन असं एक गणितच जणू आहे. आयफोन्स हे त्यांच्या सुपरफास्ट प्रोसेसिंगसाठी तसंच अगदी स्मूद एक्सपिरियन्ससाठी ओळखले जातात. अनेकजण प्रीमियम अनुभव घेण्याकरता कितीही पैसे मोजून आयफोन घ्यायला तयार असतात. आजकाल आयफोनने त्यांच्या किंमती काहीशा सामन्यांना परवडणाऱ्या केल्याने आयफोन विकत घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण कितीही काही झालं तरी शेवटी आयफोन हे देखील एक इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्यानं काही काळाने स्लो होऊ शकतो. पण काही सोप्या ट्रिक्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या फोनला पुन्हा आधीसारखं सुपरफास्ट करु शकता. तर अशाच पाच सोप्या ट्रिक्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचा iPhone अगदी नवीनसारखा सुपरफास्ट होईल.

मोबाईल नेटवर्कची कंडीशन तपासा

मोबाईल नेटवर्कची कंडीशन तपासा

ॲपल कंपनीने आधीच सांगितल्याप्रमाणे त्यांचे फोन्स हे मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेटशी जास्त प्रमाणात जोडलेले असतात. म्हणदेच iPhones चे अनेक फीचर्स आणि अॅप्स हे नेटवर्क कनेक्टिव्हिटीसह काम करतात. त्यामुळे जर नेटवर्क सिग्नल कमी असल्यास, अनेक अॅप्स त्यांचं काम योग्यरित्या करू शकणार नाहीत,ज्यामुळे फोन स्लो वाटू लागतो. त्यामुले नेटवर्क कनेक्शन चेक करणंही गरजेचं असून त्यासंबधी प्रॉब्लेम आल्यास संबधित नेटवर्कच्या कस्टमर केअरशी संबध साधता येईल.

हेही वाचा :  'ही' एक टेस्टमध्ये गरोदर राहण्यास करेल मदत, अनेक महिलांना झालाय याचा फायदा

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

काम न करणारे ॲप्स थेट बंद करा

काम न करणारे ॲप्स थेट बंद करा

कधी कधी एखादे ॲप काही प्रॉब्लेममुळे हँग होऊ शकतात. जर ॲप्स अचानकपणे कोणताही प्रतिसाद देत नसल्याचं दिसून आल्यास त्यांना ‘फोर्स क्लोज’ करावं लागेल. यासाठी तुमच्या iPhone च्या डिस्प्लेच्या तळापासून वर स्वाइप करा. असे केल्याने फोनमध्ये उघडलेल्या सर्व अॅप्सच्या छोट्या विंडो दिसतील. वेगवेगळे सुरु अॅप्स तुम्ही स्लाईड करुन पाहू शकता आणि त्यातील काम न करणारं ॲप थेट वरच्या बाजूला स्वाईप करुन बंद करु शकता. दरम्यान अशाप्रकारे फोर्स क्लोज केलेले ॲप्स पुन्हा उघडण्यासाठी वेळ लागू शकतो.

वाचाःAirtel चं सिम वापरता? ‘या’ पाच रिचार्जसोबत फ्री मिळेल हॉटस्टार किंवा प्राईम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन

​आयफोनमध्ये स्टोरेज कायम उपलब्ध ठेवा​

​आयफोनमध्ये स्टोरेज कायम उपलब्ध ठेवा​

iPhones ची स्पीड कमी होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यात स्टोरेजचा अभाव हे देखील असू शकते. Apple मोबाईल मर्यादित स्टोरेज पर्यायांसह येतात ज्यामध्ये बाहेरुन मेमरी कार्ड घालता येत नाही. अशा परिस्थितीत, आयफोन वापरकर्त्यांना फोनमध्ये असलेल्या अंतर्गत स्टोरेजद्वारेच काम करावे लागेल. भरपूर अॅप्स, गेम्स, फोटो आणि व्हिडिओ साठवत असताना, फोनची मेमरी भरू लागते आणि स्टोरेज कमी झाल्यासही आयफोन स्लो काम करु लागतो. तर तुम्हाला स्टोरेज चेक करायचं असल्यास सेटिंग्जमध्ये जाऊ जनरन हा ऑप्शन सिलेक्ट करुन तुम्ही त्यामध्ये स्टोरेजवर क्लिक करुन तपशील पाहू शकता. दरम्यान स्टोरेज वाढवण्यासाठी ‘Recently Deleted’मधील फोटो डिलीट करा. वापरात नसलेले ॲप्स ऑफलोड करा. न वापरात असलेले ॲप अनइन्स्टॉल करा.

हेही वाचा :  कायम तरूण व लहान दिसण्यासाठी ही 5 कामं करतो हा डॉक्टर, खरं वय ऐकून घसरेल पायाखालची जमीनच

​वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

आयफोनचं तापमान नियंत्रित करा

आयफोनचं तापमान नियंत्रित करा

फोनच्या तापमानाचा देखील त्याच्या कामावर परिणाम होतो. फोनचे तापमान खूप जास्त किंवा खूप कमी असले तरी फोन आपली काम ठिकप्रकारे करु शकणार नाही. तापमानची वाढ ही हवामानामुळे, बाहेरील तापमानामुळे आणि चार्जिंगमुळे देखील होऊ शकते. तुमचा ॲपल आयफोनही हातात धरल्यावर गरम किंवा थंड वाटत असेल, तर सर्वप्रथम त्याचे तापमान सामान्य करण्याचा प्रयत्न करा. यासाठी फोन वारंवार चार्जिंगवर ठेवू नका किंवा जास्त चार्ज करू नका. आयफोन गरम होत असल्यास, त्यावरचे कव्हर काढा. फोनवर जास्त ॲप्स सुरु असल्यास ते बंद करा. शक्य असल्यास फोन थोडावेळ बंद देखील ठेवू शकता. आयफोनचा योग्य वापर करण्यासाठी तापमान नियंत्रण करणं गरजेचं आहे.

वाचा :AC Flipkart Sale: सर्वात स्वस्तात खरेदी करा एसी, पुन्हा नाही मिळणार अशी संधी​

आयफोन बॅटरी हेल्थ ही आहे महत्त्वाची

आयफोन बॅटरी हेल्थ ही आहे महत्त्वाची

सर्व प्रकारच्या रिचार्जेबल बॅटरीतील केमिकल एज काही काळाने कमी होते. केमिकल एज कमी झाल्यामुळे बॅटरीची क्षमता आणि पिकअपची कार्यक्षमता देखील कमी होऊ लागते. त्याचा परिणाम फोन प्रोसेसिंगवरही दिसून येतो आणि फोन स्लो व्हायला लागतो. अशा परिस्थितीत, आपण वेळोवेळी आपल्या iPhone च्या बॅटरी हेल्थ तपासत राहणं गरजेच आहे. बॅटरी हेल्थ चेक करण्यासाठी आयफोनवर सेटिंग्ज उघडून त्यात बॅटरीच्या ऑप्शनमध्ये बॅटरी हेल्थ आणि चार्जिंगचा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करुन तुम्हाला बॅटरी हेल्थ पाहता येईल.

हेही वाचा :  'मेड इन इंडिया iPhone 15 अजिबात घेऊ नका,' भारताचं यश पाहून चीन घाबरला? म्हणतो 'भारतीय घाणेरडे, वरणाचा वास...,'

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

महाराष्ट्रातील ‘या’ गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण …