विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईत विजयी मिरवणूक; गर्दी टाळण्यासाठी वाहतूकीत मोठा बदल

Team India Welcome : रोहित शर्माच्या विश्वविजयी टीम इंडियाची उद्या मुंबईत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. मुंबईत संध्याकाळी 5 नंतर मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी ही टीम इंडियाची विजयी परेड असेल. टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी भारतीय टीम बार्बाडोसमधून दिल्लीसाठी रवाना झाली आहे. उद्या सकाळी सहा वाजता भारतीय टीम दिल्ली विमानतळावर दाखल होईल. त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी भारतीय टीम मोदींसोबत ब्रेकफास्ट करणार आहे.. त्यानंतर दुपारी ही टीम मुंबईकडे रवाना होईल. त्यानंतर संध्याकाळी मुंबईत भारतीय टीमची विजयी परेड काढण्यात येईल.. टी-20 वर्ल्ड कपच्या विजयाचा आनंद विजयी परेडसह साजरा करुया असं आवाहन कॅप्टन रोहित शर्माने क्रिकेट फॅन्सना केले. या अनुषंगाने  गर्दी टाळण्यासाठी मुंबईत वाहतूकीत मोठा बदल करण्यात आला आहे. 

भारतीय क्रिकेट संघाची शोभायात्रा मरीन ड्राईव्ह येथे आयोजित करण्यात येत आहे. त्याकरीता सदर ठिकाणी लोकांची मोठया प्रमाणात गर्दी होणे अपेक्षित आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाहतूकीची कोंडी टाळण्याकरिता 4 जुलैरोजी मुंबईच्या वाहतूकीत आवश्यकते नुसार सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूकीकरीता बदल करण्यात आले आहेत. कार्यक्रमाकरीता येणाऱ्या प्रेक्षकांनी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा (विशेषतः रेल्वे / लोकल ट्रेनचा) वापर करावा असे आवाहनही करण्यात आले आहे. 
एन.सी.पी.ए ते मेघदूत ब्रिज पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरीता उत्तर वाहीनी बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून रामनाथ पोददार चौक (गोदरेज जंक्शन) महर्षी कर्वे रोडने अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) मरीन लाईन्स-चर्नी रोड-पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस जंक्शन) पुढे इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा :  दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला 'डबल धक्का', कर्णधार रोहितसह वेगवान गोलंदाजही संघाबाहेर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंक्शन डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्गे सी.टी.ओ जंक्शन-सी.एस.एम.टी- पुढे इच्छित स्थळी जातील.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंक्शन डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्गे सी.टी.ओ जंक्शन- मेट्रो जंक्शन श्यामलदास जंक्शन डावे वळण – प्रिंसेस स्ट्रिट मार्गाने पुढे इच्छित स्थळी जातील.

मेघदूत ब्रिज (प्रिसेंस स्ट्रि ब्रीज) ते एन.सी.पी. ए / हुतात्मा राजगुरु चौक (मंत्रालय जंक्शन) करीता सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून केम्स कॉर्नर ब्रिज येथुन डावे वळण घेवुन नाना चौक येथुन पुढे इच्छित स्थळी जातील. आर.टी.आय जंक्शन येथुन डावे वळण घेवुन एन. एस पाटकर मार्ग– पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस)- डावे वळण. एस. व्ही.पी रोड- तसेच पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) येथे उजवे वळण घेवुन महर्षी कर्वे मार्गाने पुढे इच्छित स्थळी जातील. विनोली चौपाटी – डावे वळण ऑपेरा हाऊस उजवे वळण महर्षी कर्वे मार्गे- पुढे इच्छित स्थळी जातील. मेघदूत ब्रिज (प्रिसेंस स्ट्रि ब्रीज) श्यामलदास जंक्शन-वर्धमान जंक्शन – मेट्रो जंक्शन पुढे इच्छित स्थळी जातील.

अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) ते किलाचंद चौक (सुंदरमहल जंक्शन) उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून महर्षी कर्वे रोड मार्गे – अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) – मरीन लाईन्स-चर्नी रोड-पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) जंक्शन मार्गाने पुढे इच्छित स्थळी जातील. 

हेही वाचा :  बलात्काराच्या आरोपाखाली अटक क्रिकेटर दानुष्का गुणथिलाकाला सशर्त जामीन!

दिनशा वाच्छा मार्गे हा डब्ल्यु.आय.ए.ए चौक ते रतनलाल बुबना चौक (मरीन प्लाझा जंक्शन) असा उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून  महर्षी कर्वे रोड मार्गे – अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) – मरीन लाईन्स-चर्नी रोड-पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) जंक्शन पुढे इच्छित स्थळी जातील.

हुतात्मा राजगुरु चौक (मंत्रालय जंक्शन) ते वेणुताई चव्हाण चौक (एअर इंडीया जंक्शन) पर्यत उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून महर्षी कर्वे रोड मार्गे रामनाथ पोददार चौक (गोदरेज जंक्शन) अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) मरीन लाईन्स-चर्नी रोड- पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस जंक्शन) मार्गाने पुढे इच्छित स्थळी जातील.

फ्रि प्रेस जर्नल जंक्शन येथुन एन.एस रोडला येणारी उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्य वाहनांकरीता बंद राहील. (स्थानिक रहीवाशी व अत्यावश्यक वाहने वगळून) जमनालाल बजाज मार्ग ते मुरली देवरा चौक असा उत्तर वाहीनीने एन.एस. रोडकडे जाणारा विनय के शहा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील. (स्थानिक रहीवाशी व अत्यावश्यक वाहने वगळून) कोस्टल रोड वरील उत्तर वाहिनी व दक्षिण वाहीनी चालू राहतील. तेथुन जाणारी वाहतूक प्रिसेंस स्ट्रिट मागीने वळविण्यात येईल.सर्व  मार्गावरील दक्षिण च उत्तर वाहीनीवर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :  पत्नीला शिकवण्यासाठी विमा पॉलिसीतून पैसे काढले, कर्जही काढलं... नोकरी लागताच प्रियकराबरोबर पळून गेली



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मला हात लावू नका’, प्रिन्सिपलला शिक्षकांनीच धक्के देत ऑफिसबाहेर काढलं, मोबाईलही खेचून घेतला अन् अखेर…; पाहा VIDEO

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये चक्क महिला मुख्याध्यापकाला धक्क देत कार्यालयाबाहेर काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली …

वसईहून ठाण्याला जाण्यासाठी आता भुयारी मार्ग; काय आहे हा प्रकल्प?

Tunnel Between Vasai To Thane: वसईवरुन ठाण्याला लोकलने जायचं म्हणजे खूप वेळ खर्ची होतो. तर, …