WHO कडून अलर्ट, भारतीय कंपनीचे हे २ सिरप चिमुकल्यांसाठी घातक, १८ मुलांचा गेलाय जीव

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2 कफ सिरपबाबत इशारा दिला आहे. WHO ने भारतीय फार्मास्युटिकल कंपनी मॅरियन बायोटेकच्या कफ सिरपबद्दल इशारा दिला आहे. पुढे असे म्हटले आहे की, मेरियन बायोटेकने बनवलेले दोन कफ सिरप मुलांसाठी वापरू नयेत. बुधवारी याबाबतचा इशारा जाहिर करताना डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, ही वैद्यकीय उत्पादने म्हणजेच मेरियन बायोटेकद्वारे निर्मित कफ सिरप अशी आहेत की ते गुणवत्ता मानके किंवा वैशिष्ट्यांची पूर्तता करण्यात पूर्णपणे अपयशी ठरतात. (फोटो सौजन्य – iStock)

​या दोन सिरपवर बंदी

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, डब्ल्यूएचओने आपल्या वेबसाइटवर एक अलर्ट जाहीर केला आहे की, ते दोन वैद्यकीय उत्पादनांच्या निकृष्ट आणि दूषित उत्पादनांचा संदर्भ देते. ही दोन उत्पादने आहेत AMBRONOL Syrup आणि DOK-1 Max Syrup. दोन्ही उत्पादनांचे निर्माते Marion Biotech (MARION BIOTECH PVT. LTD) आहेत. आजपर्यंत कंपनीच्या निर्मात्याने WHO ला सुरक्षेची हमी दिलेली नाही ज्यामुळे या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा :  'राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी...'; CM शिंदेंना Dynamic म्हणत मोदींची खास पोस्ट

​दूषित वैद्यकीय उत्पादन

WHO ने आपल्या वेबसाइटवर एक अलर्ट जाहीर केला आहे. या डब्ल्यूएचओ मेडिकल प्रोडक्ट अलर्ट दोन दूषित उत्पादनांबाबत माहिती दिली आहे. या औषधांचा संबंध उझबेकिस्तानमध्ये घडलेल्या घटनेशी आहे. २२ डिसेंबर २०२२ मध्ये डब्ल्यूएचओला रिपोर्ट केले आहे.

(वाचा – लठ्ठपणामुळे नसांमध्ये जमा झाले घाणेरडं Cholesterol, 82 किलोच्या बँकरने 5 महिन्यात केलं जबरदस्त Weightloss))

​कफ सिरपमध्ये सापडले हे घटक

मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या मूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेल्या औषधांवर बंदी आणण्यात आली आहे. या कंपनीने लहान मुलांसाठी तयार केलेल्या कफ सिरप औषधांवर बंदी घातली आहे. ही कंपनी भारतातील उत्तर प्रदेशात असून या कंपनीनेAmbronol आणि DOK-1 Max या दोन औषधांची निर्मिती केली. चाचणी केल्यानंतर यामध्ये डायइथिलीन ग्लायकोल तसेच इथिलीन ग्लायकोल घटक योग्य प्रमाणात नसल्याचे उघड झाले. यानंतर या सिरपवर बंदी घातली आहे.

(वाचा – मेलो तरी चालेल, पण… संजय दत्तने कॅन्सर ट्रिटमेंट घेण्यास दिला होता नकार, असा होता अंगावर काटा आणणारा प्रवास))

​१८ मुलांचा मृत्यू

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उझबेकिस्तानच्या खोकल्याचे सिरप प्यायल्याने 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. उझबेकिस्तान सरकारने मुलांच्या मृत्यूसाठी एका भारतीय औषध कंपनीला जबाबदार धरले. मेरियन बायोटेक या औषध कंपनीने तयार केलेले डॉक-१ मॅक्स सिरप प्यायल्याने मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. फार्मास्युटिकल कंपनीने 2012 मध्ये उझबेकिस्तानच्या बाजारपेठेत प्रवेश केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीने तयार केलेले डॉक-१ मॅक्स सिरप सध्या भारतीय बाजारपेठेत विकले जात नाही.

हेही वाचा :  Kalicharan Maharaj: कालीचरण महाराज पुन्हा चर्चेत; आता काय केल हिंदूंना आवाहन?

(वाचा – Cataract Symptoms : मोतिबिंदूची ही लक्षणे खूप आधीच दिसतात, वेळीच संकेत जाणून घेतल्यास सर्जरी टाळाल)

WHO ची माहिती

​हे औषध प्यायल्याने काय होते

कमी दर्जाची उत्पादने असलेले हे औषध मुलांसाठी असुरक्षित आहे. त्याचा वापर विशेषत: मुलांमध्ये केल्याने गंभीर दुखापत किंवा मृत्यू होऊ शकतो. विषारी परिणामांमध्ये ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे, अतिसार, लघवी करण्यास असमर्थ असणे, डोकेदुखी, बदललेली मानसिक स्थिती आणि तीव्र मूत्रपिंडाचा समावेश असू शकतो. यासारखा त्रास होतो.

(वाचा – Low Sodium Foods: सतत लघवीला होतेय? सोडियमची उच्च पातळी रक्ताचं करतंय पाणी, खायला सुरू करा ५ पदार्थ))

​याचा भारतीयांना किती धोका

भारतीयांना या औषधांचा धोका अजिबात नाही. कारण भारतीय बाजारात ही दोन्ही औषधे वापरली जात नाहीत. त्यामुळे पालकांनी निश्चिंत राहावे.

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …