कोण असली? कोण नकली? महाराष्ट्राच्या मतदारांनी दिला कौल; पाहा एक्झिट पोलचे आकडे

Maharashtra Exit Poll Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्याआधी विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एनडीए की ‘इंडिया’? कोण पंतप्रधान होणार? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला 4 तारखेला मिळतीलच. दरम्यान महाराष्ट्रातील निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. 

देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या जास्त लोकसभा जागा असलेला महाराष्ट्र निर्णायक ठरणार आहे. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पडली. दोन्हीकडचा एक गट भाजपसोबत जाऊन सत्तेत बसला. दरम्यान असली शिवसेना आणि नकली शिवसेना तसेच असली राष्ट्रवादी आणि नकली राष्ट्रवादी हा मुद्दा रंगला. पण मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिलाय हे महत्वाचे आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कोणाचे पारडे जड आहे हे पाहुया. 

रिपब्लिक मॅट्रीजच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात ठाकरे गटाला 9 जागा तर शिंदे गटाला 4 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 7 तर अजित पवार गटाला 1 जागा मिळेल.

इंडिया टीव्हीच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ठाकरे गटाला 11 जागा तर शिंदे गटाला 6 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 5 तर अजित पवार गटाला 1 जागा मिळेल.

हेही वाचा :  Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीमागील मास्टरमाईंड कोण? शरद पवारांनी एका ओळीत संपवला विषय, म्हणाले...

एबीच्या सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 9 जागा तर शिंदे गटाला 6 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला  तर अजित पवार गटाला 

टीव्ही 9 पोलस्ट्रेट सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 14 जागा तर शिंदे गटाला 4 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 6 तर अजित पवार गटाला शुन्य जागा मिळेल.

न्यूज 18 च्या सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 7 जागा तर शिंदे गटाला 7 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 4  तर अजित पवार गटाला 2 जागा मिळतील. 

एकूण एक्झिट पोल पाहिले असता महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट आघाडीवर दिसत आहेत. तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गट पिछाडीवर दिसत आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही

Seema Adhye, Zee 24 Taas : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारने आज आपला अर्थसंकल्प …