WhatsApp ची मोठी घोषणा! ‘हे’ फिचर कायमचं बंद होणार; कितीही क्लिक करुन फायदा नाही

Whatsapp ने आपण लवकरच युजर्सला दिली जाणारी एक सुविधा हटवणार असल्याची घोषणा केली होती. मार्च महिन्यात Whatsapp कडून ही माहिती देण्यात आली होती. यापुढे Whatsapp युजर्स दुसऱ्या एखाद्या युजर्सच्या Whatsapp Profile Photo चा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या फिचरला Screenshot Blocking – Profile Photo असं नाव देण्यात आलं आहे. 

इंस्टंट मेसेजिंग अॅपच्या आगामी फिचर्सवर लक्ष ठेवणारी वेबसाईट WA Beta Info ने दिलेल्या माहितीनुसार, Whatsapp नवी अपडेट आणत आहे. यामद्ये IOS युजर्स दुसऱ्या युजर्सच्या प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत. 

Android Beta व्हर्जनमध्ये अपडेट

अँड्रॉईडमधील Whatsapp Beta व्हर्जनमध्ये सध्या युजर्स दुसऱ्या युजरच्या प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकत आहेत. सध्या हे फिचर iOS प्लॅटफॉर्मवर आलेलं नाही. पण लवकरच त्याचं टेस्टिंग सुरु होणार आहे. 

हे फिचर नेमकं कसं काम करणार?

WA Beta Info ने काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये जर प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केल्यास काय होईल हे दाखवण्यात आलं आहे. तुमच्या स्क्रीनवर ‘Screen Capture Blocked’ असा संदेश येईल. याखाली लिहिण्यात आलं आहे की, प्रत्येकाच्या गोपनीयतेचा आदर ठेवण्यात आला आहे. हा स्क्रीन कॅप्चर आता ब्लॉक झालं आहे. 

हेही वाचा :  Whats App चे प्रायव्हसीसाठी नवीन फीचर; अशी करा सेटिंग

WhatsApp युजर्सना वैयक्तिक माहितीवरील नियंत्रण देणार

WA Beta Info ने लिहिलं आहे की, आमच्या मते कंपनी यासह आपल्या युजर्सला त्याच्या खासगी माहितीवर नियंत्रण देत आहेत. तसंच या फिचरसह प्रोफाईल फोटोचा गैरवापर रोखण्याचा प्रयत्न आहे. या फिचरमुळे धोका पूर्णपणे तर टळणार नाही. पण प्रायव्हसी कंट्रोलसाठी हे चांगलं पाऊल आहे. 

WhatsApp वर येणारं हे Screenshot Blocking – Profile Photo फिचर सध्या डेव्हलप केलं जात आहे. सर्व चाचण्या झाल्यानंतर आता स्टेबल व्हर्जनसाठी जारी कऱण्यात आलं आहे. आता हे स्टेबल व्हर्जन कधी लाँच होणार यासंबंधी कोणतीही माहिती दिलेली नाही. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

CEAT वर्धन टायर्स: वाहतूक आणि शेतीमध्ये सर्वात आघाडीवर

टायर्सच्या जगात, CEAT हा शब्द विश्वास आणि विश्वासार्हतेचा समानार्थी आहे. नेहमीच नावीन्यपूर्ण आणि गुणवत्ते साठी …

ब्लॅक डॉटचं रहस्य काय? समजल्यावर आयफोन युजर्सदेखील होतील हैराण

iPhone Black Dark: आयफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. काहीजण टिकाऊ म्हणून आयफोन वापरतात तर …