वाद मिटवण्यासाठी गेला आणि स्वतःचाच जीव गमावून बसला; पुण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्याची हत्या

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या (Pune Crime) सिंहगड रोड भागातील रायकर मळा परिसरात महावितरणमधील (Mahavitaran) एका वरिष्ठ तंत्रज्ञाचा (टेक्निशियन) तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनोहर गार्डनजवळील खंडोबा मंदीर रोड परिसरात घडली आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

गोपाळ कैलास मंडळे (वय 32, रा. ओवी अंगण कॉलनी, जाधवनगर, रायकर मळा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी, गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने सिद्धांत दिलीप मांडवकर (वय.18,रा. रायकरमळा धायरी) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. याबाबत सोमवारी रात्री उशीरापर्यंत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान हा खून अनैतिक संबंधाचा संशय आणि पूर्वी झालेल्या वादातून करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ मंडळे हे महावितरण येथे वरिष्ठ वरिष्ठ तंत्रज्ञ (टेक्निशियन) म्हणून नोकरीस होते. ते महावितरणच्या सिंहगड रोड विभागात कार्यरत होते. गेल्या चार वर्षांपासून मंडळे हे रायकर मळा येथे आई, मुलगा आणि पत्नीसोबत राहात होते. मृत मंडळे आणि आरोपी हे दोघेही एकमेकांना चांगलेच ओळखत होते. काही दिवसांपूर्वी आरोपी मांडवकर आणि गोपाळ मंडळे यांच्यात वाद झाला होता. 

हेही वाचा :  महिलांना नको असलेल्या गर्भधारणेपासून मिळणार दिलासा? गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

त्यानंतर सोमवारी मंडळे यांनी फोन करून मांडवकरला बोलवून घेतले होते. एकाच दुचाकीवर ते वाद मिटविण्यासाठी निघाले होते. खंडोबा मंदीर रोड परिसरात आले असताना, दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी मांडवकर याने चाकूने मंडळे यांच्या गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झाल्याने मंडळे यांचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा रस्त्यावर हा सगळी घटना घडली. तेथून जाणार्‍या एका व्यक्तीने पोलिसांना याबाबत

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, जयंत राजुरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मंडळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. मंडळे यांचा खून केल्यानंतर मांडवकर हा तेथून फरार झाला होता. स्थानिक पोलिसांबरोबर गुन्हे शाखेची पथके देखील त्याचा शोध घेत होती. त्यावेळी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांना मांडवकर हा धायरी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत मांडवकर याने खूनाची कबुली दिली.नात्यातील एका महिलेसोबत मांडवकर याचे अनैतिक संबंध असल्याचा मंडळे यांना संशय होता. त्यातून दोघांत वाद झाला होता. तो वाद मिटविण्यासाठी दोघे एकत्र आले असताना परत त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी त्याने मंडळे यांच्यावर चाकूने हल्ला करून खून केला. त्यानंतर मांडवकर फरार झाला.

हेही वाचा :  जेवताना ही 2 कामं करणा-यांचं पोट कधीच होत नाही साफ व पचनाचे वाजतात 12, हे 8 नियम कराच फॉलो



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …