UPSC CSE २०२२ च्या रिक्त जागा वाढल्या, रेल्वेसाठीही नवीन पदे..जाणून घ्या तपशील

UPSC CSE 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२२ (UPSC Civil Services Exam 2022) संदर्भात एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यूपीएससी नागरी सेवा २०२२ (UPSC CSE 2022) मधील काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी होणाऱ्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या रिक्त जागांची संख्या वाढवण्यात आली आहे. याअंतर्गत रेल्वेसाठी काही नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. आता भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (Indian Railway Management Services) म्हणजेच आयआरएमएस ग्रुप ए भरती (IRMS Group A Recruitment) देखील यूपीएससी नागरी सेवा परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यासंदर्भात केंद्रीय लोकसेवा आयोगाने नोटीस जाहीर केली आहे.

युनियन लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या नवी अपडेट अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार रिक्त पदांमध्ये १५० पदे वाढली आहेत. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा ८६१ पदांसाठी होणार होती. आता ती एकूण १०११ पदांसाठी होणार आहे. भारतीय रेल्वेचा एक भाग असलेल्या आयआरएमएसमध्ये नवीन १५० पदे भरली जाणार आहेत. ही संभाव्य रिक्त जागांची भरती असून गरजेनुसार त्यात वाढ किंवा घटही केली जाऊ शकते असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :  एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

IRMS म्हणजे काय?
भारतीय रेल्वेने नोटीस जाहीर करून दिलेल्या माहितीनुसार देशातील ८ वेगवेगळ्या राष्ट्रीय वाहतूक सेवांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. या सर्व वाहतूकदारांना एकत्र करून आयआरएमएस तयार करण्यात आला आहे. तिचे पूर्ण नाव भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा आहे.

भारतीय नौदलात १५०० हून अधिक पदांची भरती, जाणून घ्या तपशील

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार

IRMS ग्रुप ए रिक्त जागांचा तपशील
आयआरएमस मधील ग्रुप ए पदांसाठी भरती केली जाणार आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेद्वारे ही भरती केली जाणार आहे. यावर्षी या विभागात १५० पदे भरण्यात येणार आहेत. यापैकी ६ पदे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव असतील.

Bank Job 2022: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या डिटेल्स
पात्रता
यूपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, आयआरएमएस ग्रुप ए पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये बसण्यासाठी यूपीएससीच्या इतर परीक्षांप्रमाणेच पात्रता पूर्ण करावी लागणार आहे. ज्या उमेदवारांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ साठी आधीच अर्ज केला असेल त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

हेही वाचा :  दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत पर्सनल असिस्टंट पदांची भरती

यूपीएससी नागरी आणि वन सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे नोटिफिकेशन जाहीर
नागरी सेवा आणि वनसेवा प्राथमिक परीक्षा देणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अंतिम वर्ष/सेमिस्टर परीक्षेत बसलेले उमेदवार देखील यूपीएससीद्वारे आयोजित नागरी सेवा आणि वन सेवांच्या एकत्रित प्राथमिक परीक्षेत बसू शकतात.

आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या तारखांना उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. विविध राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सरकारी नियमांनुसार सवलत देण्यात आली आहे. उमेदवारांना अधिक आणि इतर तपशीलांसाठी नोटिफिकेशन पाहता येणार आहे.

School Reopening: ‘या’ कारणामुळे शाळा तात्काळ सुरु करणे गरजेचे, केंद्राचे महत्वाचे निर्देश
ईएसई परीक्षेच्या तारखा जाहीर
यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा परीक्षेच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग श्रेणी या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तर, ईएसई पर्सनॅलिटी टेस्ट २०२१ साठी पात्र झालेले उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. उमेदवार नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या वेळेनुसार मुलाखतीला पोहोचणे आवश्यत आहे. ही परीक्षा २८ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२२ या कालावधीत घेतली जाणार आहे. यावेळी व्यक्तिमत्व चाचणीची तारीख आणि वेळेत बदल करण्याची कोणतीही विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या. परीक्षेच्या आधी प्रवेशपत्र अपलोड केले जाणार आहे. नवीन अपडेटसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा :  मुंबई विद्यापीठाकडून पुनर्मूल्यांकनाच्या निकालापूर्वीच फेरपरीक्षेचा घाट

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार
IAF Recruitment 2022: इंडियन एअर फोर्समध्ये विविध पदांची भरती

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सारस्वत बँकेत कनिष्ठ अधिकारी पदांची भरती

Saraswat Co-operative Bank Limited Invites Application From 150 Eligible Candidates For Junior Officer Posts. Eligible …

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत विविध पदांची भरती

Employees Provident Fund Organisation Invites Application From 2859 Eligible Candidates For Social Security Assistant & …