Twitter चा दे धक्का ! ट्विटर व्हेरिफाईडकडून सर्व व्हेरिफाईड अकाऊंट अनफॉलो

Twitter Verified Follows ‘No One’ : आता बातमी समाज माध्यमातून. ट्विटने दे धक्का दिला आहे. ट्विटर व्हेरीफाईडकडून सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आली आहेत. कालपासून जवळपास 2 लाख 25 हजार अकाउंट्स अनफॉलो करण्यात आलेत. आता ट्विटर व्हेरिफाईड कुणालाही फॉलो करणार नाही. ट्विटरनं यापूर्वी जवळपास 4 लाख 20 हजार व्हेरिफाईड अकाउंट्सना फॉलो केले होते.

ट्विटर ब्लू पॉलिसी आणल्यानंतर, कंपनीनं 1 एप्रिलपासून सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स बंद करण्याचा आणि त्या यूजर्ससाठी चेकमार्क म्हणजे ब्लू टिक काढून टाकण्याचा इशारा दिला होता. आता सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात येत असल्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

जगातील श्रीमंतापैकी एक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर एकानंतर एक धक्कादायक निर्णय घेतले आहे. ट्विटरचा  पदभार हाती घेतल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. धक्कादायक निर्णयामुळे एलॉन मस्क नेहमीच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरचा आयकॉनिक लोगो ब्लू बर्ड हटवा. आता Doge Image ट्विटर होमपेजवर आणली. आता तर ट्विटरने पुन्हा आपला आयकॉनिक लोगो ठेवलाय. मात्र, यासोबतच आणखी एक बदल केला आहे. ‘ट्विटर व्हेरीफाईड’कडून  सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आले आहेत. म्हणजेच, आता ट्विटर व्हेरिफाईड कोणालाही फॉलो करणार नाही.

हेही वाचा :  20 दिवसात 5 मर्डर, मामी-भाचेसुनेने का आखला परिवाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर

ट्विटरने याआधी 1 एप्रिलपासून सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स बंद करण्याचा इशारा दिला होता आणि ज्यांच्याकडे ते अजूनही आहेत परंतु ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी पैसे देत नाहीत त्यांच्यासाठी चेकमार्क काढून टाकण्याचा इशारा दिला होता. पण आता ट्विटरने सगळ्यांनाच अनफॉलो केल्यामुळे ट्विटर व्हेरिफाईड त्यांना फॉलो करत आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …