टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत भाकरी करण्याची 1 सोपी पद्धत

Bhakri Tips : रोजचा स्वयंपाक करणे हे मोठे कौशल्य आहे. यात अनेक गृहिणी खूप माहीर असतात. तर काहींची चांगलीच तारांबळ उडते. कधी कधी स्वयंपाक बिघडल्याने टेन्शन येते. घरी जर अचानक पाहुणे आले तर अनेकांची तारांबळ उडते. रोजच्या स्वयंपाकाचे नियोजन करणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. तसेच कोणाला काय आवडते हेही गृहिणीला लक्षात ठेवावे लागते. मुलांचे हट्टही असतात. ते पुरवताना त्यांच्या नाकी नऊ येतात. स्वयंपाकातील सगळेच प्रत्येकाला येते असं नाही. त्यात भाकरी किंवा चपाती भाजणे हे मोठे कौशल्य असते. तुम्हाल भाकरी करता येत नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत भाकरी करण्याची 1 सोपी पद्धत सांगणार आहोत.

चांगली भाकरी बनविणे हे मोठे कौशल्य आहे. एखादा पदार्थ चुकला तर, संपूर्ण पदार्थ वाया जातो. त्याच प्रमाणे चपाती आणि भाकरीचे देखील आहे. पहिल्यांदा चपाती किंवा भाकरी बनवताना ती परफेक्ट तयार होत नाही. ती कडक बनते किंवा तुटते. कितीही पीठ चांगले मळले तरी भाकरी काही केल्या गोल आणि टम्म फुगत नाही.

हेही वाचा :  ऋजुता दिवेकरने सांगितले ऐन तारुण्यात येणाऱ्या ॲक्ने-पिंपल्सच्या समस्येवरील​​ 3 कारणे​ आणि ​उपाय

भाकरी ही ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदळाची केली जाते. त्यात कोळी किंवा आगरी पद्धतीची भाकरी करायची असेल तर त्यासाठी त्याची रेसिपी माहिती हवी. अनेकांना भाकरी बनवायला जमत नाही. भाकरीचे पीठ मळणे, ती एकसारखी थापणे आणि नीट भाजणे या सगळ्या पद्धती अतिशय महत्त्वाच्या आहेत. जर आपल्याला सोप्या पद्धतीने आगरीपद्धतीची भाकरी शिकायची असेल, तर ही पद्धत नक्की ट्राय करु शकता. या पद्धतीमुळे आगरीपद्धतीची भाकरी झटपट तयार होईल, टम्म फुगेल आणि  तुटणार देखील नाही.

काय कराल कृती?

प्रथम तुम्ही तांदळाचं पीठ घ्या. पाणी घ्या. कृती करताना एका भांड्यात गरम पाणी घ्या. त्यात पीठ टाका. नंतर ती पीठ परातीत घ्या आणि चांगले मळा. पण त्यासाठी थोडे गरम असतानाच पीठ हलक्या हाताने मळून घ्या. पीठ चांगले मळल्यानंतर भाकऱ्या चांगल्या होतात. त्यामुळे हाताला थोडे – थोडे पाणी लावून पीठ मऊ मळून घ्या.

अशी बनवा भाकरी

कणीक अर्थात पीठ मळून झाल्यानंतर एक छोटासा गोळा घ्या. हाताला थोडे पाणी लावून हे पीठ मळून घ्या. पीठ हातावर घेऊन त्याला गोलाकार द्या. आता परातीवर थोडे पाणी लावा आणि हाताने भाकरी थापून घ्या. भाकरी जास्त पातळ किंवा जाड थापायची नाही. भाकरी थापत असताना तवा गरम करण्यासाठी ठेवा, तवा गरम झाल्यानंतर त्यात तयार भाकरी घालून दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे आगरीपद्धतीची भाकरी खाण्यासाठी तयार होईल.   

हेही वाचा :  Cooking tips: या Kitchen Tips वापरून जेवण बनवाल तर उत्तम गृहिणी झालाच म्हणून समजा !



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …