पैसे दिले नाहीत म्हणून तृतीयपंथियांची तरुणाला बेदम मारहाण; रेल्वेचं उत्तर ऐकून येईल संताप

Viral Video : लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अनेकदा भिक्षुक किंवा तृतीयपंथी पैसे मागताना दिसतात. पैसे मागण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे रेल्वे प्रवासी त्यांना पैसे देऊन त्यांच्यापासून सुटका करुन घेतात. मात्र काही तृतीयपंथी हे पैसे मागताना इतकी अरेरावी करतात की लोकांना संताप अनावर होतो. अनेकवेळा प्रवासी त्यांची तक्रार करतात आणि रेल्वे पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात. काहीवेळा यांची हिमंत इतकी वाढलेली असते की ते प्रवाशांना मारहाण देखील करतात. 

अशाच एक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अशाच एका व्हिडीओमध्ये काही तृतीयपंथी प्रवाशाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. याची रेल्वे प्रशासनाला सुरुवातीला तक्रार करताच त्यांनी दिलेल्या उत्तराने प्रवाशांनी डोक्याला हात लावला आहे. मात्र त्यानंतर या तृतीयपंथियांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र प्रवाशांकडून यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

बिहारच्या कटिहार-पाटणा इंटरसिटी गाडीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तृतीयपंथी चढले आणि प्रवाशांकडून पैसे मागू लागले. काही प्रवाशांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ 24 फेब्रुवारीच्या रात्री @aazadrajeev नावाच्या सोशल मीडिया युजरच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला होता.

हेही वाचा :  'भारत माझाही देश आहे, पंजाबींच्या देशभक्तीचा पुरावा देण्याची...'; खलिस्तान समर्थनावरुन टीकेनंतर गायकाची पोस्ट

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

“हा व्हिडिओ 15713 कटिहार-पाटणा इंटरसिटीचा आहे. खगरिया येथून तृतीयपंथीयांचा एक गट ट्रेनमध्ये चढला आणि प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करू लागला. उमेशनगर ते इसकमळ दरम्यान पैसे न देणाऱ्या प्रवाशांना या तृतीयपंथीयांनी बेदम मारहाण केली. प्रवाशांची काळजी घेणारे कोणी नाही. इथे सर्व रामभरोसे आहे,” असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलं धक्कादायक उत्तर

25 फेब्रुवारी रोजी सकाळी, दानापूर डिवीजनने या प्रकरणाची दखल घेतली आणि सोनपूर डिवीजनला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. त्यानंतर सोनपूर डिवीजनने हे प्रकरण आरपीएफकडे पाठवले. आरपीएफने ही ट्रेन डीएनआर डिवीजन टीटीई चालवत असल्याचे सांगून त्यांनी याप्रकरणाची दखल घ्यावी असे सांगण्यात आले. सुमारे 22 तास सोशल मीडियावर रेल्वे अधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत होते. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपी तृतियपंथीयांना अटक केली.

हेही वाचा :  Narendra Modi की Rahul Gandhi, आज Lok Sabha निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? जाणून घ्या Survey काय सांगतोय

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

याप्रकरणी एका युजरने, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांना तिकिटापेक्षा तृतीयपंथीयांना जास्त पैसे द्यावे लागतात आणि पैसे न दिल्यास अपमान आणि मारहाण सहन करावी लागते, असे म्हटलं आहे. आणखी एका युजरने, रेल्वे पोलीस दलाला कठोर आदेश दिल्याशिवाय ट्रेनमधील तृतीयपंथीयांची दहशत थांबवता येणार नाही. कृपया हे थांबवा, असे म्हटलं आहे. दुसऱ्या एकाने, हे रेल्वेचे लोक एकमेकांवर ढकलत आहेत. तोपर्यंत ट्रेन शेवटच्या थांब्यावर पोहोचली असेल आणि तृतीयपंथी आपापल्या घरी गेले असतील, असे म्हटलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त होत आहे. 17 वर्षांचा …

‘माझे खासगी फोटो..’, मालीवाल यांचा ‘आप’वर गंभीर आरोप! म्हणाल्या, ‘माझ्याबद्दल घाणेरड्या..’

Swati Maliwal Assault AAP Plot: आम आदमी पार्टी म्हणजेच ‘आप’च्या राजस्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांना झालेल्या …