होरपळ! आठवड्याच्या शेवटी उन्हाचीच बॅटिंग; सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचारही नकोच

Maharashtra Weather News : राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अकाळी पावसाचा मारा केल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर, काही ठिकाणी शेतपिकं आणि फळबागांचंही नुकसान झालं आहे. एकिकडे अवकाळी संकटं वाढत असतानाच दुसरीकडे मात्र गारपीटीचाही मारा सुरुच आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील किमान पाच दिवसांसाठी राज्यातील हवामानाची हीच स्थिती पाहायला मिळणार असून, त्यात फारसे बदल अपेक्षित नाहीत. त्यामुळं आठवड्याचा शेवट पाहता सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्य़ाच्या विचारात असाल तर आधी हवामानाचा अंदाज पाहण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. 

मुंबईत उष्णतेची लाट 

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह उपनगरांत तापमानात घट नोंदवण्यात आली असली तरीही आर्द्रतेमुळं मात्र उकाडा जाणवत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमान 33 ते 37 अंशांच्या घरात राहणार असून, त्यामुळं जाणवणारा दाह अधिक असणार आहे. उन्हाचे चटके कमी झाले असले तरीही शहरातील नागगिरांना उष्णा दुपटीनं जाणवत असल्यानं अडचणी वाढल्या आहेत. 

 

पुढील 48 तासांसाठी रत्नागिरी, रायगड आणि पालघर भागांमध्ये उष्णतेची ही लाट अधिक तीव्र होणार असून, त्याचा परिणाम मुंबईतील किनारपट्टी क्षेत्रांमध्ये अधिक दिसून येणार आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रांमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहणार असून, काही भागांमध्ये मुंबईप्रमाणंच उष्णतेची लाट येणार आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच रायगडमध्ये अवकाळीनं डोकं वर काढलं असून, पुढील 24 तासांमध्ये इथं वातावरण ढगाळ राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, एकिकडे देशाच्या आर्थिक राजधानीत ही स्थिती असताना राज्यात सर्वाधिक तापमानाचा आकडा 42 अंशांच्या पलिकडे जाईल, तर किमान तापमान 33 ते 29 अंशांदरम्यान असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 



Source link

हेही वाचा :  मुंबईला मिळणार दुसरे मरीन ड्राइव्ह, पाऊण तासांचा प्रवास 10 मिनिटांवर, पण वेगमर्यादा किती?

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

27 दिवसांचाच इंधनसाठा शिल्लक; सुनीता विल्यम्स यांच्यापुढं अंतराळात नवं आव्हान; NASA कडून व्हिडीओ शेअर

NASA Shares a video : अंतराळ क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि महत्त्वाची संशोधनं करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या …

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …