तेच कपडे पुन्हा वापरले? Radhika Merchant च्या साधेपणानं जिंकली मनं; पाहून म्हणाल अंबानींची होणारी सून लाखात एक

Radhika Merchant Anant Ambani : किती ही श्रीमंती, ही मंडळी एकदा वापरलेल्या कपड्यांचं काय करत असतील बुवा? कपड्यांच्या बाबतीत सेलिब्रिटींची मजाच असते…. नाही का? हे असं तुम्हीआम्ही एकदातरी ऐकलंच असेल. त्यातही सेलिब्रिटी त्यांच्या इतक्या महागड्या कपड्यांचा वापर केल्यानंतर पुढे त्यांचं काय करतात हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. तुम्हीआम्ही एखादा कपडा वारंवार वापरतो. पण, ही मंडळी मात्र नव्या कार्यक्रमांना तितक्याच नवनवीन रुपात दिसतात. बरं, त्यांच्या कपड्यांच्या किमतीही लाखोंच्या घरात असतात. त्यामुळं ते कपडे एकसारखे वापरण्याचा प्रश्नच सहसा उदभवत नाही. पण, काहीजण मात्र याला अपवाद असतात. 

राधिका मर्चंटनं पुन्हा वापरले Roka समारंभातील कपडे 

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची होणारी सून, राधिका मर्चंट (Radhika Merchant Anant Ambani wedding) ही त्यापैकीच एक. लवकरच राधिका आणि अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लग्नबंधनात अडकणार आहेत. तत्पूर्वी ही जोडी देशभरातील विविध मंदिरांना भेट देत आहे. तिरुपती मंदिराला भेट दिल्यानंतर नुकतीच ही जोडी गुरुवायूर येथे पोहोचली होती. 

सोशल मीडियावर राधिका आणि अनंतच्या गुरुवायूर (Guruvayur) भेटीदरम्यानचे अनेक फोटो व्हायरलही झाले. जिथं ही जोडी हात जोडून आपल्या भावी आयुष्यासाठी देवाचा आशीर्वाद घेताना दिसली. यावेळी अनंत पारंपरिक दाक्षिणातच्य वेशभूषेत दिसला. तर, राधिकानं मात्र सुरेख अशा गुलाबी रंगाच्या बुट्टीदार ड्रेसला पसंती दिली होती. गुलाबी रंगाची सलवार आणि त्यावर सोनेरी जरीकाम आणि बुट्टी तिच्या ड्रेसचं सौंदर्य खुलवून आणत होती. 

हेही वाचा :  राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगासमोर दादागटाचे धक्कादायक आरोप, आज सुनावणीत काय घडलं?

 

एकिकडे अनंत आणि राधिकाचे फोटो व्हायरल झाले, तर दुसरीकडे चर्चा झाली ती म्हणजे राधिकाच्या जुन्या फोटोंची. हे फोटो होते या दोघांच्याही रोका समारंभातील (Radhika Merchant Anant Ambani roka). कारण, राधिकानं गुरूवायूर भेटीमध्ये तिच्या रोका सोहळ्यातील कपडे पुन्हा वापरत सर्वांच्या नजरा वळवल्या होत्या. यावेळी तिनं फक्त सोबतची ओढणी घेतली नसल्यामुळं लूक काहीसा वेगळा दिसत होता. एका अर्थी तेच कपडे वापरूनही राधिकानं ते नव्हा पद्धतीनं वापरले हेसुद्धा इथं पाहता आलं. ज्यामुळं काहींनी तिच्या फॅशन सेन्सचं आणि सोबतच साधेपणाचंही कौतुक केलं. 

Mukesh Ambanis to be daughter in law Radhika Merchant Repeats Roka Outfit Anant Ambani accompained her

Mukesh Ambanis to be daughter in law Radhika Merchant Repeats Roka Outfit Anant Ambani accompained her

सध्या राधिकाचा स्वभाव अनेकांच्याच मनाचा ठाव घेत आहे. अंबानी कुटुंबीय असो, एखाद्या ठिकाणी गेलं असता तेथील स्थानिक असो किंवा आणखी कुणी. सर्वांप्रती तिची वागणूक आणि विनम्र स्वभाव पाहून सर्वजण भारावत आहेत. इतकंच नव्हे, तर अंबानींची सून लाखात एक; म्हणत तिचं कौतुकही करत आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘BJP केवळ 110 जागाच जिंकला’, राऊतांचा दावा; म्हणाले, ‘..तर मोदी PM झाले नसते’

Sanjay Raut On Election Commission Of India: “2024 च्या निवडणुकीत भारताच्या निवडणूक आयोगाचे वर्तन सरळ …

Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : वरुणराजा पुन्हा एका सक्रीय झाला आहे. मान्सूने (Monsoon Update ) राज्यासह देशात …