The Rock Dwayne Johnson : जिममध्ये झोपणाऱ्या UFC फायटरला रॉकनं गिफ्ट केलं घर!

Dwayne The Rock buys house for UFC fighter Themba Gorimbo : लोकप्रिय अमेरिकन अभिनेता ड्वेन जॉनसन ज्याला सगळे ‘द रॉक’ या नावानं ओळखतात. त्याच्या मुलींमुळे आणि चित्रपटांसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. द रॉकनं झिंबाबेच्या एका MMA फायटरला चक्क घर भेट केलं आहे. त्या फायटरचे नाव Themba Gorimbo असे आहे. सध्या युनायटेड स्टेट्समध्ये राहत असलेल्या Themba Gorimbo नं  हॉलिवूड सुपरस्टारचे लक्ष वेधून घेतले.

Themba Gorimbo नं याविषयी बोलताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावेळी त्यानं त्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी सांगितलं होतं. त्याच्याकडे फक्त 7 डॉलर उरले होते. अशा परिस्थितीतही त्यानं एका मॅचमधून मिळालेल्या बक्षिसाची रक्कम ही त्याच्या गावात असलेल्या लोकांना चांगलं आणि शुद्ध पाणी मिळावं यासाठी एक बोअरवेल बांधण्यासारख्या चांगल्या कामासाठी दान केले. त्यानंतर तो पुन्हा 7 डॉलरवर येऊन थांबला. त्याला बक्षिसाच्या रक्कमेत गाडी किंवा घर घेता आलं असतं पण त्यानं असं न करता इतरांचा विचार केला. खरंतर Themba Gorimbo हा गेल्या बऱ्याच काळापासून हा त्याच्या जीममध्येच झोपत होता. तिथे ट्रेनिंग घेत असताना तो जीममध्येच झोपायचा. जीममधल्या सोफ्याला त्यानं त्याचं घर बनवलं होतं. 

दरम्यान, ड्वेन जॉनसननं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो Themba Gorimbo च्या जीममध्ये जाऊन त्याला कशा प्रकारे सर्प्राईज देतो हे दाखवलं आहे. त्यानंतर ड्वेननं त्यानं Themba Gorimbo साठी त्यानं एक घर लीजरवर घेतल्याचे सांगत त्याला ते घर दाखवले. त्या घरात Themba Gorimbo आता त्याच्या कुटुंबासोबत राहणार असं ड्वेननं सांगितलं. हा व्हिडीओ शेअर करत लाइट आहे, सगळे बिल्स आधीच देण्यात आलं आहे. तू आणि तुझं कुटुंब या नवीन घराचा आनंद घ्या. 

हेही वाचा : धार्मिक श्रद्धेवरून ट्रोल होण्यावर सारा अली खाननं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

हेही वाचा :  फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय, एबीपीच्या मंचावर आमिर खान म्हणाला...

ड्वेन जॉनसन हा MMA चा चाहता आहे. त्यानं 2019 मध्ये Jorge Masvidal आणि Nate Diaz यांच्यातील फाइटसाठी “BMF” बेल्ट सादर केला होता. त्यात जेव्हा त्याला Themba Gorimbo विषयी कळलं आणि त्यातही त्याच्याकडे फक्त 7$ उरले आहेत हे कळलं तेव्हा ड्वेन जॉनसनला स्वत: विषयी आठवलं. त्याच्याकडे देखील सुरुवातीला मियामीला आल्यावर इतकेच पैसे होते. इतकंच नाही तर ड्वेन जॉनसनकडे सेव्हन बक्स प्रोडक्शन नावाची प्रोडक्शन कंपनी देखील आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …