जिद्द असावी अशी..!! टेम्पो चालकाच्या मुलाची MPSC परीक्षेत दुसऱ्यांदा बाजी

MPSC Success Story : MPSC मार्फत दरवर्षी हजारो पदांसाठी परीक्षा घेतली जाते. यासाठी मुलं-मुली अहोरात्र अभ्यास करत असतात. अधिकारी होण्याचं स्वप्न अनेकांचे असते. मात्र यात काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा. दरम्यान, एका टेम्पो चालकाच्या मुलाने एमपीएससी परीक्षेत एक नाही तर दोन वेळा यश मिळविले. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी येथील प्रमोद बाळासाहेब चौगुले (Pramod Chaugule) यांनी MPSC परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश संपादित केलं आहे.

चौगुले यांचे वडिलोपार्जित गाव मिरज तालुक्यातील सोनी हे आहे, मात्र गेल्या सात वर्षांपासून त्यांचे कुटुंब कामानिमित्त सांगलीत स्थायिक झाले आहे. प्रमोद यांनी नवोदय विद्यामंदिर पलूस येथून शिक्षण घेतले आणि त्यानंतर वालचंद महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. यांचे यश हे त्याच्या पालकांचे एक ध्येय होते. याच कारणामुळे प्रमोदच्या आई-वडिलांनी त्यांना कधीही कसलीही कमतरता पडू दिली नाही, जेणेकरून त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे.

प्रमोद यांचे वडील ऑटो ड्रायव्हर होते आणि आई टेलरचे काम करत होती. 2020 मध्ये, प्रमोद चौगुले यांना MPSC मध्ये प्रथम येण्याचा मान मिळाला आणि नंतर त्यांची उद्योग विभागातील उपसंचालक पदावर नियुक्ती झाली. परंतु त्यांना पोलिस खात्यात रुजू व्हायचे होते. म्हणून त्यांनी 2021 मध्ये पुन्हा एमपीएससीची परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये प्रमोद चौगुले यांना पुन्हा एकदा यश प्राप्त झाले आहे. त्यांची डीवायएसपी या पदावर मजल मारली.

हेही वाचा :  बायोमेडिकल संशोधनासाठी राष्ट्रीय प्राणी संसाधन सुविधात 10 ते पदवीधरांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीय नौदलात विविध पदांच्या 129 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी!

Indian Navy Bharti 2023 भारतीय नौदल अकादमी अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली …

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, काबाडकष्टानंतर शेतकरी कन्या बनली पोलिस उपनिरीक्षक !

MPSC PSI Success Story नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील तिळवण येथील सोनाली सोनवणे ही कृषीकन्या. तिच्या …