Gender Reveal Party मध्ये कोसळलं विमान! धक्कादायक Video पाहुण्यांच्या कॅमेरात कैद

Gender Reveal Party Plane Crash Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका जोडप्याने आपलं जन्माला येणारं बाळ मुलगा आहे की मुलगी हे सांगण्यासाठी आयोजित केलेल्या जेंडर रिवील पार्टीत झालेला भीषण अपघात कैद झाला आहे. लॉनवर आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीमध्ये मोठ्या संख्येनं पाहुणे उपस्थित होते. मात्र या आनंदनाच्या क्षणाला गालबोट लागलं आणि त्यात एकाच मृत्यू झाला. ही घटना मॅक्सिकोमध्ये घडली. पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांसमोरच विमान कोसळलं आणि वैमानिकाचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमान हे एक छोट्या आकाराचं खासगी स्टंट विमान होतं.

नेमकं घडलं काय?

जोडपं उभं असलेल्या जागेवरुन अवघ्या काही फुटांवरुन उड्डाण घेत हे विमान निळ्या किंवा गुलाबी रंगाचा धूर सोडेल आणि त्या माध्यमातून होणारं बाळ मुलगा आहे की मुलगी हे समजेल असं नियोजन होतं. ठरल्याप्रमाणे हे जोडपं ‘ओह बेबी’ अशा अक्षरांसहीत पांढऱ्या, गुलाबी फुग्यांनी केलेल्या डेकोरेशनसमोर लॉनवर उभे होते. दोघेही एकमेकांचे हात पकडून उभे होते. त्यावेळेस त्यांच्या मागून आकाशातून एक विमान आलं आणि त्याने गुलाबी रंगाचा धूर सोडला. यावरुन मुलगी होणार हे निश्चित झाल्यानंतर पाहुण्यांनी एकच जल्लोष केला. आरडाओरड करुन, किंकाळून या लोकांनी सेलिब्रेशन केलं.

हेही वाचा :  स्मार्टफोनमधील Parental Control म्हणजे नेमकं काय? पालकांना कसा होतो याचा फायदा

…अन् विमान कोसळलं

मात्र दुसरीकडे हवेत या विमानाचा उजवा पंख तुटल्याने नियंत्रण बिघडलं आणि हे विमान या लॉनच्या पलीकडे असलेल्या नारळाच्या झाडांच्या मागे जाऊन कोसळलं. स्थानिक पोलिसांनी विमान कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यामध्ये वैमानिक सापडला. त्यांनी जखमी अवस्थेतील वैमानिकाला रुग्णालयात भरती केलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, असं ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

अनेकांनी केली टीका

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या अशाप्रकारच्या जेंडर रिव्हील पार्टींची गरज असते का असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशा नको ती हौस असल्याने इतरांना प्राण गमवावे लागतात असं एकाने म्हटलं आहे. पाहुण्यांनी वैमानिकाचा थोडाही विचार न करता कॅमेरा पुन्हा जोडप्याकडे फिरवला, असं म्हणत अन्य एकाने लोकांच्या असंवेदनशील वागण्यावर टीका केली आहे. 

यापूर्वीही घडल्यात अनेक दुर्घटना

जेंडर रिव्हील पार्टीमध्ये आई-वडील होणारं जोडपं आपलं बाळ मुलगा आहे की मुलगी याबद्दल जवळच्या लोकांना कळवतं. यापूर्वीही अशाप्रकारच्या जेंडर रिव्हील पार्टींमध्ये 2020 साली कॅलिफॉर्नियामधील जंगलांना आग लागली होती. नंतर ही आग 10 हजार एकरांवर पसरली होती. अन्य एका अशाच पार्टीमध्येही झाडांना आग लागली होती. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियामधील एका जोडप्याने बाळाचं लिंग काय असेल हे जाहीर करताना चक्क कार जाळून दिली होती.

हेही वाचा :  Ashadhi Ekadashi 2023 : पंढरीची वारी आज पुण्यात; वाहतूक मार्गांत मोठे बदल, काही रस्ते बंद!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

माळशेजचं सौंदर्य आणखी खुलणार; अर्थसंकल्पात मिळाली मंजुरी, देशात प्रथमच असं घडणार

Malshej Ghat Skywalk: राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. शुक्रवारी विधानभवनात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. …

सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा सर्वात मोठा खुलासा? NASA ला आधीच सर्व काही माहित होते तरीही…

Sunita Williams Boeing Starliner Spacecraft : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात अडकल्या आहेत. एका …