बापरे! एअरपोर्टवर नाही तर थेट समुद्रात उतरलं विमान अन्…; समोर आला धक्कादायक Video

Trending Viral Video : अपघात… कधी कुठे आणि कसा होईल याचा काही नेम नसतो. त्याची कुणकुण असते पण, खात्रीशीर माहिती नसल्यामुळं अचानकच संकट ओढावतं आणि गोष्टी बिघडतात. असे अनेक प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचजणांनी पाहिले. काहींनी तर अशा संकटांचा सामनाही केला. अशा एका प्रसंगातून नुकतेच अनेक विमानप्रवासी बचावले आणि या अपघाताची माहिती मिळताच ऐकणाऱ्यांच्या काळजाचं पाणी झाली. 

नेमकं काय घडलं? 

अमेरिकेच्या नौदलाचं एक सर्वेलन्स एअरक्राफ्ट अर्थाच नौदलाचं एक गस्त घालणारं विमान लँडिंगच्याच वेळी गडबडलं आणि हवाईनजीक असणाऱ्या ओहू नावाच्या बेटाजवळच ते समुद्राच्या पाण्यात गेलं. सोमवारी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. बोईंग पोसायडन 8 ए नावाचं हे प्रवाशांनी भरलेलं विमान मरीन कॉर्प्स बेसवरील रनवेपासून थोडं पुढे गेलं आणि केनोहे खाडी क्षेत्रात त्याचा अपघात झाला. उपलब्ध माहितीनुसार या अपघातात क्रू किंवा प्रवास करणाऱ्या कोणााही दुखापत झाली नाही, पण अपघाताचं स्वरुप काळजाचा ठोका चुकवणारं होतं. 

सोशल मीडियावर समोर आलेल्या माहितीनुसार आणि काही फोटो, व्हिडीओनुसार अमेरिकेच्या नौदलाच्या या विमानाचा काही भाग समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसत आहे. हवामान विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पाऊस, ढगांची दाटी, कमी दृश्यमानता आणि आव्हानात्मह हवामानामुळं हा अपघाता झाला. अधिकृत माहितीनुसार अपघात झाला त्यावेळी दृश्यमानता अवघी 1.6 किमी आणि वाऱ्याचा वेग 34 किमी इतका होता. हा अपघात झाल्यानंतर एकच गोंधळ माजला. 

हेही वाचा :  टीव्ही अँकरने Live कार्यक्रमात मानले कॅन्सरचे आभार; नेटकऱ्यांनी केलं धाडसाचं कौतुक

 

विमानातील प्रवाशांनी कसंबसं विमानातून बाहेर येत मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. मरीन मेजर जॉर्डन फॉक्स यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार संभाव्य धोका पाहता या विमानाच्या चारही बाजूंना तातडीनं बचावकार्य हाती घेत बूथ उभारण्यात आले, ज्यामुळं त्यातील प्रवाशांचा जीव वाटला. 

अमेरिकन नौदलाच्या वतीनं सागरी हद्दीमध्ये गस्त घालण्यासाठी हे विमान तैनात करण्यात आलं होतं. या अपघातानंतर स्थानिकांनी पर्यावरणाचा ऱ्हास, विमानातून होणाऱ्या तेलाची गळती आणि इतर दूषित पदार्थांबाबत चिंता व्यक्त केली. 

नौदलाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोसायडन 8 ए हे एक अतिशय महत्त्वाचं विमान असून, 275 मिलियन डॉलर इतक्या खर्चात तयार करण्यात आलेल्या या विमानाच्या माध्यमातून नौदलाला मोठी मदत होते. गोपनीय माहिती मिळवणं. युद्धाभ्यासात मदत करणं, गस्त घालणं, या आणि अशा अनेक कामांसाठी नौदलाकडून या विमानाचा वापर करण्यात येतो. 

हेही वाचा :  Weather Update : नाताळला हुडहुडी वाढणार; पारा 13 अंशांवर, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …