शिजान खानच्या जामिनावर 2 मार्चला होणार सुनावणी

Sheezan Khan: अभिनेत्री  तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शिजान खानला (Sheezan Khan) आजही जामीन मिळाला नाही. वसई सत्र न्यायालयाने सुनावणीची पुढील तारीख 2 मार्च ही दिली आहे. शिजानच्या वकिलांनी दिनांक 20 फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. आज (27 फेब्रुवारी) शिजानचे वकिल शैलेंद्र मिश्रा यांनी न्यायालयात युक्तिवादाच्या वेळी आपला अशिल मुस्लिम असल्यामुळे त्याला जामीन मिळत नसल्याचा युक्तिवाद केला. याला सरकारी वकिल संजय मोरे आणि तुनिषाचे वकिल तरुण शर्मा प्रत्युत्तर दिलं. 

दोन तास झाला युक्तिवाद

शिजान खानच्या जामीन अर्जावर आज जवळपास दोन तास युक्तिवाद झाला. अर्धा तास बंद रुममध्ये हा युक्तिवाद झाला. आतापुढी युक्तिवाद 2 मार्चला पुन्हा होईल. शिझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजे 24 डिसेंबरला तुनिषाने वसईच्या कामण येथील सेटवर आत्महत्या केली होती. तुनिषाला अत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिजान खानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शिजान न्यायलयीन कोठडीत आहे. 

शिजानच्या वकिलांच्या वतीने त्याला जामीन मिळावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ही प्रयत्न सुरु होते. मात्र, वाळीव पोलिसांनी वसई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानं  शिजानच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायलयात जामीन अर्ज मागे घेतला. वसई सत्र न्यायालयात जामिनसाठी अर्ज दाखल केला होता. तेव्हापासून शिजानला पुन्हा तारीख पे तारीख मिळत आहे.

हेही वाचा :  नदाव लॅपिड यांनी माफी मागितली; म्हणाले, पीडितांचा अपमान करणं माझा उद्देश नव्हता...  

कोण आहे शिझान खान? 

शिझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलेला शिझान अभिनेता आणि मॉडेल आहे. शिझानला बालपणीच अभिनयाची आवड लागल्याने त्याने हेच करिअर निवडलं. ‘जोधा अकबर’ (Jodha Akbar) या मालिकेच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानं ‘अलीबाबा : दास्ताने ए कुबुल’ (Ali Baba : Dastaan – E – Kabul) या मालिकेमध्ये देखील काम केलं होतं. या मालिकेत तुनिषानं देखील प्रमुख भूमिका साकारली.

तुनिषानं या मालिकांमध्ये केलं काम

तुनिषा शर्माने ‘भारत का वीर पुत्तर : महाराणा प्रताप’ (Bharat Ka Veer Putra : Maharana Pratap), ‘इंटरनेट वाला लव’ (Internet Wala Love), ‘इश्क सुभान अल्लाह’ (Ishq Subhan Allah) अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. तुनिषाच्यानं आत्महत्या केल्यानं अनेकांना धक्का बसला होता. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sheezan Khan Mother Post: शिझान खानची बहिण रुग्णालयात दाखल; आई भावूक, म्हणाली, “आम्ही मुस्लिम आहोत म्हणून…”

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …