Sharddha Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबविरुद्ध पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

Sharddha Walkar Murder Case :  मुंबईतील श्रद्धा वालकर (Shraddha Murder case) मर्डर केसनं अवघा देश हादरून गेलाय. श्रद्धा मर्डर केसमध्ये नवंनवीन धक्कादायक खुलासे होत आहे. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकरचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यानं मतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले, ते फ्रिजमध्ये स्टोअर केलं. त्यानंतर दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरात जाऊन ठराविक अंतरानं टाकून दिले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या खुनाचा उलगडा आता झाला. या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या हाती अद्याप ठोस पुरावे लागले नव्हते. मात्र आता आफताबविरुद्ध पोलिसांना यश मिळाले असून पोलिसांची हाती आफताबचा ऑडिओ (Audio Clip) लागली आहे. नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये श्रद्धा आणि आफताबचे काय संभाषण झाले होते ते जाणून घेऊया… 

दिल्ली पोलिसांना मिळालेल्या ऑडिओमध्ये आफताब श्रद्धासोबत (Sharddha Walkar Murder Case) भांडत आहे. ऑडिओमध्ये आफताब आणि श्रद्धामध्ये वाद होत आहेत. आफताब श्रद्धाचा छळ करत होता हे या ऑडिओवरून सिद्ध होते. दरम्यान दिल्ली पोलीस या ऑडिओला मोठा पुरावा मानत आहेत. या ऑडिओमुळे (Audio Clip) हत्येच्या तपासात हत्येचा हेतू स्पष्ट होईल, असे तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच या ऑडिओशी आफताबचा आवाज जुळण्यासाठी दिल्ली पोलीस आफताबच्या आवाजाचा नमुना घेत आहेत. सीबीआयची सीएफएसएल टीम आफताबच्या आवाजाचा नमुना आणि ऑडिओ पुराव्याचा नमुना जुळवणार आहे.   

हेही वाचा :  ...अन् लोकल ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! रात्री पावणेअकराला घडला विचित्र अपघात

वाचा : कोरोनापासून मास्क, सॅनिटायझर नाहीतर ‘ही’ वस्तू जास्त सुरक्षित ठेवते, पाहा Video 

आफताबची नार्को टेस्ट

आफताब सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. सीबीआय त्याला आज, सोमवारी तिहार तुरुंगातून घेऊन जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धा वॉकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को टेस्ट झाली आहे. यापूर्वी त्यांनी पॉलीग्राफ चाचणीला सामोरे जावे लागले होते.

18 मे रोजी श्रद्धाची हत्या 

पोलिसांच्या चौकशीत आफताबनेच श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितले होते. आफताब हा श्रद्धाचा प्रियकर होता. दोघेही मुंबईचे रहिवासी असून ते दिल्लीला शिफ्ट झाले होते. दिल्लीत दोघेही मेहरौली येथे फ्लॅट घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आफताबने सांगितले होते की, 18 मे रोजी त्याचे श्रद्धासोबत भांडण झाले होते. यानंतर त्यांनी श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे केले. आफताबने हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. तो रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचा तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे.

आफताबला 12 नोव्हेंबरला अटक 

श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. कुणाला तिच्या हत्येचा संशय येऊ नये म्हणून तो श्रद्धाचे सोशल मीडिया अकाउंट वापरत राहिला. आफताबने श्रद्धाच्या खात्यातून 54 हजार रुपयेही ट्रान्सफर केले होते. श्रद्धाचे मोबाइल लोकेशन आणि बँक खात्याच्या तपशीलाच्या मदतीने पोलीस आफताबपर्यंत पोहोचले. आफताबला पोलिसांनी 12 नोव्हेंबरला अटक केली होती.

हेही वाचा :  Fack Check : Lionel Messi चं भाजप कनेक्शन? 'त्या' Tattoo मुळे रंगली चर्चा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार? कुठे देणार उघडीप?

Maharashtra Weather News : मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर जून महिन्यात हा पाऊस परतणार की दगा देणार? …

‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी …