Sharad Mohol : “…म्हणून माझ्या नवऱ्याची हत्या झाली”, स्वाती मोहोळ स्पष्टच म्हणाल्या ‘माझा नवरा वाघ होता…’

Nitesh Rane Meet Sharad Mohol : पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्याप्रकरणात (Sharad Mohol Murder) नवा खुलासा समोर आलाय. शरद मोहोळवर गोळीबार करताना पुण्यातल्या (Pune Crime News) एका गुंडाच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आल्याचं उघडकीस झालंय. आरोपी मुन्ना पोळेकरने त्याच्या दोन साथीदारांसह शरद मोहोळवर गोळीबार केला होता. मात्र हा गोळीबार करताना मुन्ना पोळेकरने (Munna Polekar) पुण्यातल्या दुसऱ्या एका नामांकित गुंडाच्या नावाने घोषणाबाजी केल्याचं पुढं येतंय. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉर (Pune Gangwar) भडकण्याची चिन्हं आहेत. तर दुसरीकडे पुणे पोलिसांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे. अशातच आता शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुण्यात हत्या करण्यात आलेल्या शरद मोहळच्या कुटुंबीयांची भेट घेतली. “भाजप मोहोळ कुटुंबीयांच्या पाठीशी असून शरद मोहोळ यांनी हिंदुत्वासाठी जे काम सुरू केलंय ते त्यांच्या पत्नीनं सुरू ठेवावं”, अशी प्रतिक्रिया राणेंनी यावेळी दिली. तीन खुनांचे आरोप असलेला गुंड शरद मोहोळ जामिनावर होता. त्याची 5 जानेवारीला दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता स्वाती मोहोळ (Swati Mohol first reaction) यांनी मोर्चा सांभाळल्याचं पहायला मिळतंय.

हेही वाचा :  BTSग्रुपचा नाद! ८वीत शिकणाऱ्या मुलींनी गाठला कळस; कोरियाला जाण्यासाठी घर सोडले अन्...

काय म्हणाल्या स्वाती मोहोळ?

राज्य सरकार आणि प्रशासनावर आपला पूर्ण विश्वास आहे. कायदा आपल्याला न्याय देईल. माझा नवरा हिंदुत्ववादी होता, हिंदुत्ववादासाठी काम करत होता म्हणून माझ्या नवऱ्यासोबत अशी घटना घडली. जर समोरच्या लोकांना असं वाटत असेल की, अशा घटनेमुळे मी खचून जाईल, तर त्यांनी लक्षात ठेवावं, माझा नवरा हा वाघ होता आणि मी त्यांची वाघीण आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी हिंदुत्वासाठी का करणार, असं स्वाती मोहोळ म्हणाल्या आहेत.

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपींची नावे

साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर(वय 20, रा. सुतारदरा, कोथरुड), विठ्ठल किसन गडले (वय 34, रा. सुतारदरा, कोथरुड), अमित मारुती कानगुडे (वय 24, रा. धायरी), नामदेव महिपत कानगुडे (35, रा. भूगाव), चंद्रकांत शाहु शेळके (वय 22, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष घवाळकर (वय 20, रा. कोथरुड), रवींद्र वसंतराव पवार (वय 40) आणि संजय रामभाऊ उउ्डाण (वय 45, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …