सलील कुलकर्णींनी लाडक्या लेकासह ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या सेटला दिली भेट

Saleel Kulkarni On Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच मंडळी ही मालिका आवडीने पाहतात. गेल्या काही वर्षांत ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. अशातच या मालिकेसंदर्भातली सलील कुलकर्णींची पोस्ट व्हायरल होत आहे. 

सलील कुलकर्णींनी लाडक्या लेकासह ‘ताकर मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या सेटला भेट दिली आहे. तसेच मालिकेसंदर्भातलं त्यांचं मत मांडलं आहे. सलील कुलकर्णींनी लिहिलं आहे,”मुलांच्या लहानपणीचे आणि माझ्या बाबापणाचे अनेक क्षण सुंदर करणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. 

सलील कुलकर्णींनी पुढे लिहिलं आहे,”एका सिनेमाच्या शूटिंगसाठी फिल्मसिटीमध्ये शुभंकर आणि मी गेलो होतो आणि अचानक समोर ‘गोकुळधाम’ दिसलं. त्यानंतर मंदार चांदवडकर म्हणजेच मालिकेतील भिडेने अतिशय प्रेमाने आमची सेटवर जायची सोय केली आणि आपल्या लाडक्या जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीची भेट झाली. पुन्हा एकदा मुलं लहान झाली आणि त्या मालिकेने दिलेल्या सुंदर क्षणांचे मी मनापासून आभार मानले.”


सलील कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर त्यांची मतं स्पष्टपणे मांडत असतात. सलील कुलकर्णींची ‘जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’, ‘दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई’, ‘तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं’, ‘सासुरला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये’ अशी अनेक गाणी ऐकायला चाहत्यांना आवडतात. 

हेही वाचा :  फरहान अख्तरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा 28 जुलै 2008 रोजी पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आजही ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते आहे. 

संबंधित बातम्या

Saleel Kulkarni : लिप सिंकवर सलील कुलकर्णींची नाराजी; म्हणाले,”Live Concert दरम्यान lip Synch करणं म्हणजे…”



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …