Sainik School: राज्यात ‘या’ जिल्ह्यात तिसरी सैनिकी शाळा सुरू होणार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना लष्करी दलांमध्ये अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण मिळण्यासाठी नवीन सरकारी सैनिकी शाळा राज्यासाठी मंजूर झाली आहे. सामाजिक संस्थेच्या भागीदारीने ही शाळा सुरू करण्याला संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. ही सैनिकी शाळा अहमदनगर येथे होणार असून राज्यातील ही तिसरी सैनिकी शाळा असेल.

लष्कराच्या तिन्ही दलांत अधिकारी होण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीखेरीज बुद्धीमत्तेची सर्वाधिक गरज असते. ही बुद्धीमत्ता शालेय जीवनातच तयार करण्याचे काम संरक्षण दलांतर्गत कार्यरत असलेल्या सरकारी सैनिकी शाळा करतात. प्रवेश परीक्षा, मुलाखत व वैद्यकीय चाचणीद्वारे आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक त्या बुद्धीमत्तेचा विकास करून राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए), आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) व नेव्हल अकादमीसाठी (एनए) उत्तमोत्तम छात्रसैनिक देण्याचे काम संरक्षण मंत्रालयातील सैनिकी शाळा १९६१ पासून करत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात देशात प्रत्येक राज्यात एक अशी सैनिकी शाळा सुरू करण्यात आली. सातारा सैनिकी शाळा ही पहिल्या काही शाळांपैकी एक होती. परंतु पाच वर्षांपूर्वी काही राज्यांत दोन शाळा सुरू करण्याचे नियोजन झाले. त्यातच महाराष्ट्रातील चंद्रपूर सैनिकी शाळेचा समावेश होता. यानुसार सातारा, चंद्रपूरपाठोपाठ आता राज्याला अहमदनगर येथे आणखी एक अशी सैनिकी शाळा मिळणार आहे.

हेही वाचा :  NVS मध्ये १९२५ पदे रिक्त, भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

संरक्षण मंत्रालयाने शनिवारी २१ नव्या सैनिकी शाळांना परवानगी दिली. या शाळा संरक्षण मंत्रालयाच्या सैनिकी शाळा मंडळांतर्गत कार्यरत असल्या तरी त्या सामाजिक संस्थांच्या भागीदारीतून चालवल्या जाणार आहेत. त्यासाठी अहमदनगर येथील डॉ. व्ही. विखे पाटील या संस्थेची निवड करण्यात आली आहे. राज्याला चंद्रपूर येथे दुसरी सैनिकी शाळा ‘सर्जिकल स्ट्राइक’ चे मुख्य समन्वयक लेफ्टनंट जनरल (निवृत्त) आर. आर. निंभोरकर यांच्या पुढाकाराने मिळाली होती. विशेष म्हणजे, जनरल निंभोरकर हे स्वत: सातारा सैनिकी शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.

SSC Result 2022: दहावी, बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडूनच

मुलींना प्रवेश

सैनिकी शाळेत २०१९ पर्यंत मुलींना प्रवेश नव्हता. पण त्यानंतर देशातील सात शाळांमध्ये मुलींसाठी प्रवेश सुरू करण्यात आला. त्यामध्ये चंद्रपूर सैनिकी शाळेचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्प्यात मागीलवर्षी सातारा सैनिकी शाळेतदेखील मुलींना प्रवेश सुरू करण्यात आला. इयत्ता सहावी व नवव्या वर्गात या शाळेत प्रवेश घेतला जातो.

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शाळा; पालकांचे सुट्टीचे बेत रद्द
Mumbai Metro मध्ये विविध पदांची भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …