Sachin Tendulkar: ‘…अन्यथा कायदेशीर परिणामांना सामोरं जावं’; बच्चू कडू यांचा क्रिकेटच्या देवाला अल्टीमेटम!

Sachin Tendulkar Online Game Advertisement : राज्याचे माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू ( MLA Bacchu Kadu ) यांनी थेट क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याच्याविरोधात दंड थोपटले आहे. सचिन तेंडुलकरविरोधात बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे, त्यामुळे येत्या काळात वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जाहीरात ( Online Games ) तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तेंडुलकर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. एवढंच नाही तर ऑनलाइन जाहीरातीचा विरोध करावा, नाहीतर प्रहार स्टाईलने आंदोलन करु असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. ऑनलाइन गेम मुळे अनेक लोकांचे जीव गेले आणि आत्महत्या झाल्या आहेत. जर सचिन तेंडुलकरने जाहिरात बंद नाही केली तर यासाठी वकीलाची नियुक्ती करू त्यासाठी न्यायालयात जाऊ असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळात बच्चू कडू विरुद्ध सचिन तेंडुलकर (Bacchu Kadu vs Sachin Tendulkar) हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  जन्मदात्या आईनेच लेकीला बेवारस स्थितीत सोडले, सोबत सापडलेली चिठ्ठी वाचून मन सून्न होईल

आणखी वाचा – सिक्युरिटी गार्डला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणाऱ्यास मनसेचा चोप; पाहा Video

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन Paytm First या ऑनलाइन जुगाराची जाहीरात लवकरात लवकर मागे घ्यावी. तसेच अश्या ऑनलाइन जुगाराचा स्पष्ट विरोध करावा. अन्यथा कायदेशीर परिणामांना सामोरे जावे, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. या गेममधून सर्वांची मुक्तता व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या गेममुळे पालक प्रचंड रोष व्यक्त करत आहेत. एकीकडे गेममध्ये पैसे गुंतवू नका, अशी जाहिरात करायची आणि तेच दुसरीकडे गेमची जाहिरात करायची हा दुहेरी धंदा आहे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांना पत्र पाठवले होते. त्यावेळी त्यांनी योग्य ती पावलं उचलण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने आता बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे आता सचिन तेंडूलकर जाहीरात मागे घेणार का? असा सवाल आता विचारला जात आहे. 

हेही वाचा :  मनसेकडून युतीचा प्रस्ताव आला तर? दोन्ही ठाकरे एकत्र येणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्या क्षणाला काय...'



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …