Aadhaar-PAN link संदर्भात आयकर विभागाचा इशारा, उशीर करु नका अन्यथा…

Aadhaar-PAN link News In Marathi: आयकर विभाग (Income Tax) अनेकदा पॅनकार्डसंदर्भात नवीन माहिती अपडेट करत असतं. पण गेल्या अनेक दिवसांपासून आयकर विभाग पॅनकार्डसंदर्भात एक गोष्ट वारंवार सांगत आहे, ती म्हणजे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करा. ट्विट करून आयकर विभागाने पुन्हा एकदा सर्वांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आठवण करून दिली आहे. मात्र, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला ही आयकर विभागाने दिला आहे. आता त्याची अंतिम मुदत अगदी जवळ येऊन ठेपली असून या दोन्ही कार्डची जोडणी करण्यासाठी आता काही दिवसच उरले आहेत. 

भारतीय आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. या दोन्ही कार्डची जोडणी करण्यासाठी आता काहीच दिवस उरले असताना ज्यांना उशीराने जाग आली, त्यांना मात्र आता एका अडचणीचा सामना करावा लागत आहे. या अडचणीमुळे दोन्ही कार्ड लिंक करणे अवघड झाले आहे. मात्र आयकर विभागाने या समस्येवर एक उपाय सांगितला असून ही अडचण दूर होताच अनेकांनी दोन्ही कार्ड जोडता येतील. नाहीतर मुदत संपल्यानंतर त्यांना दंड भरावा लागेल. 

हेही वाचा :  Sushama Andhare: भर सभेत सुषमा अंधारे यांचा अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट; राजकारण ढवळून निघण्याची शक्यता

1 जुलैपासून इतका दंड

आयकर कायदा 1961 अंतर्गत पॅन कार्ड, आधार कार्डशी जोडणे आवश्यक करण्यात आले आहे. 30 जून 2023 पर्यंत अंतिम तारीख देण्यात आली आहे. लिंक न केल्यास पॅन कार्ड बंद होईल. या दोन्ही कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ती मुदत वाढणे अशक्य आहे. ही मुदत संपल्यानंतर जोडणी करणाऱ्यांना 1 जुलैनंतर 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.

अन्यथा होईल नुकसान 

  1. पॅन-आधार लिंक न करण्याचे अनेक नुकसान
  2. सर्वप्रथम तुम्हाला विलंब केल्याबद्दल दंड भरावा लागेल
  3. तुम्हाला आयकर विभागाकडून कोणताही परतावा किंवा भरपाई मिळणार नाही.
  4. पॅन कार्ड बंद असल्याने तुम्हाला व्याज मिळणार नाही
  5. करदात्याकडून अधिक टीसीएस, टीडीएस वसूल केला जाईल

या कारणामुळे अडचण निर्माण 

अनेक जण अंतिम मुदतपूर्वी हे दोन्ही कार्ड जोडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या एका चुकीमुळे त्यांची दोन्ही कार्डे जोडण्यास अडचण येत आहे. आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख, लिंग अशी डेमोग्राफिक माहिती आणि पॅन कार्डवरील माहिती मिसमॅच होत आहे. ती जुळत नसल्याने दोन्ही कार्ड जुळत नसल्याने जोडण्यात अडचण येत आहे. परंतु दोन्ही कार्डावरील माहिती सारखी असेल तरच समस्या सुटू शकते.

हेही वाचा :  'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' या गाण्याचा खरा अर्थ काय? प्रत्येक शब्द अतिशय समर्पक

जर तुम्ही दोन्ही कार्डमधील नाव, जन्मतारीख आणि इतर चुका आधीच दुरुस्त केल्या असतील तर तुमचे दोन्ही कार्ड लिंक केले जातील. तरीही समस्या कायम राहिल्यास विभागाने ती प्राप्त केल्यानंतर त्यावर उपाय सुचविले आहेत. तुम्ही फक्त पॅन सेवा पुरवठादारांच्या केंद्रांवरच समस्या सोडवू शकता. तुम्ही फी भरून सर्वोत्तम बायोमेट्रिक प्रमाणीकरण सुविधा मिळवू शकता. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कोसळले असले तरी देशातील बाजारपेठेत …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …