‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर रवीना टंडनची पहिली प्रतिक्रिया

Raveena Tondon On Padmashri Award : सिने-अभिनेत्री रवीना टंडनला (Raveena Tondon) ‘पद्मश्री पुरस्कार’  (Padmashri Award) जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत रवीना टंडन म्हणाली, “माझ्या कामाची दखल घेत पद्मश्री पुरस्कारासाठी माझी विचारणा केल्याबद्दल खूप आनंद होत आहे.” 

रवीना टंडन म्हणाली, “मला ‘पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, यावर माझा विश्वास बसत नाही. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला माझ्या वडिलांची खूप आठवण येत आहे. गेल्या 30 वर्षांपासून वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून मी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता माझ्या फिल्मी करिअरची दखल घेत ‘पद्मश्री पुरस्कारा’साठी माझा विचार केल्याबद्दल मला खरच खूप आनंद होत आहे”. 

पर्यावरणासंदर्भात भाष्य करत रवीन पुढे म्हणाली, “देशभरातील डोंगराळ भागातील जमीनीचा नाश होत चालला आहे. यावर शास्त्रज्ञदेखील वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. आता पर्यावरणाचा विचार करुन विकासाचं नियोजन करण्याची गरज आहे. पण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे प्रश्न वाढवता कामा नये”.

रवीना टंडनला ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर! 

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रवीना टंडनला ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रवीनाने 1992 साली ‘पत्थर के फूल’ (Patthar Ke Phool) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. पहिल्याच सिनेमातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरच्या सर्वोतकृष्ट महिला पदार्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रवीनाला ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. मात्र दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलं आहे. 


परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां अशा अनेक लोकप्रिय सिनेमांचा रवीना टंडन भाग आहे. रवीना 1990 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती. ‘पद्मश्री पुरस्कारा’आधी तिला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 2001 साली तिला ‘दमन’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

हेही वाचा :  अवतार : द वे ऑफ वॉटर

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Raveena Tandon : रवीना टंडनला ‘पद्मश्री पुरस्कार’; कलाविश्वातील कामगिरीचा सन्मान



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …