‘राज ठाकरेंचे ‘ते’ पत्र मोदींना मिळालेच नाही, नुसती स्टंटबाजी’ ठाकरे गटाने भरसभेत दाखवला पुरावा

Raj Thackerays Letter: देशातील रेसरल महिलांनी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. यानंतर खेळाडू उपोषणासाठी बसले होते. यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच यातील आरोपी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होण्यासाठी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्याचा दावा करण्यात आला होता. पण हा दावा खोटा असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. काय घडलाय हा प्रकार? जाणून घेऊया. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला. यानंतर महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी ठाण्यात तिसरी सभा घेतली. शिवसेनेच्या मंचावरुन बोलताना त्यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत सुषमा अंधारेंच्या भाषणातील एक क्लिप दाखवलीय. यात सुषमा अंधारे बाळासाहेबांच्या वयावरुन बोलत असताना दिसले. या क्लिपवरुन त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. 

राज ठाकरेंनी केलेल्या आरोपचे दुसऱ्या दिवशी सुषमा अंधारे यांनी भरसभेत उत्तर दिले. त्यांनीदेखील राज ठाकरेंच्या भाषणातील जुने व्हिडीओ दाखवले. तसेच महिला रेसलर प्रकरणात राज ठाकरेंनी लिहिलेले पत्र वाचून दाखवले. पत्र का वाचतायत हे लोकांना सुरुवातीला कळाले नाही. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान कार्यलयातील माहितीचा अधिकाराची कॉपी वाचून दाखवली. यानुसार राज ठाकरेंनी लिहिलेले पत्र पीएमओ कार्यालयापर्यंत पोहोचलेच नसल्याचे उत्तर देण्यात आले. यावरुन सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर स्टंटबाजी करत असल्याचा आरोप केला. 

हेही वाचा :  Weather Update: 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊस-हिमवृष्टी; IMD ने वर्तवला अंदाज

काय म्हणाले किरण माने? 

किरण माने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये या घटनेचा उल्लेख केलाय. काय म्हणाले किरण माने? जाणून घेऊया. महिला कुस्तीगीरांनी ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत त्या ब्रिजभूषणवर कारवाई करा.” अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना पाठवले आहे, असे राज ठाकरेंनी जाहीर केले होते. एक वर्षापूर्वी, 31 मे रोजी सोशल मिडीयावर ते पत्र पोस्ट केले गेले. ते पत्र प्रचंड व्हायरल झाले होते. “ब्रिजभूषणला आम्ही मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही.” असा इशाराही दिला होता.

…हा स्टंट असणार असा संशय काहीजणांना आला. ईडीच्या भितीने घाबरलेले राज ठाकरे हे धाडस करणार नाहीत अशी बर्‍याचजणांना खात्री होती. शेवटी माहितीच्या अधिकारात एकाने याविषयी अर्ज करून विचारणा केली. पंतप्रधान कार्यालयाकडून असे उत्तर आले की, ‘राज ठाकरे यांच्याकडून असे कुठलेही पत्र पंतप्रधान कार्यालयाला आलेले नाही.” ही चालबाजी होती असा आरोप किरण मानेंनी केला. 

सुषमा अंधारेंनी अणुशक्तीनगर येथे हा पर्दाफाश केला तेव्हा मी तिथे हजर होतो. उपस्थित प्रचंड जनसमुदायातून “शेSSSम शेSSSSम” असा खुप मोठा आवाज येऊ लागला… लोकांना मनापासून या फसवणुकीचे वाईट वाटलेले दिसल्याचे माने आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

हेही वाचा :  ठाणे जिल्हा सुपरस्पेशलिटी रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून ५२७ कोटीचा निधी मंजुर

एकवेळ तुम्ही निष्क्रिय असा, जनता खपवून घेईल… पण खोट्या भूलथापा देऊन जनतेच्या भावनांशी खेळू नका. आधीच या देशातले सर्वसामान्य नोकरदार, छोटे व्यावसायिक, गोरगरीब मजूर, शेतकरी, कष्टकरी आणि महिला नाडले गेलेले आहेत… जगणं हराम झालंय… त्यात तुम्ही असा थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका, असे आवाहन त्यांनी केले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राष्ट्रपतींनी मोदींना दही-साखर भरवणं हे लोकशाही संविधान मानणाऱ्यांना..’; राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut On President Murmu Feeding PM Modi Curd Sugar: उद्धव ठाकरे गटाचे खासदार तसेच …

‘BJP केवळ 110 जागाच जिंकला’, राऊतांचा दावा; म्हणाले, ‘..तर मोदी PM झाले नसते’

Sanjay Raut On Election Commission Of India: “2024 च्या निवडणुकीत भारताच्या निवडणूक आयोगाचे वर्तन सरळ …