Raj Thackeray : मनसेने 17 वर्षात काय केले? राज ठाकरेंनी दिला डिजीटल पुरावा

Raj Thackeray At MNS Anniversary: महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन आहे (MNS Anniversary). वर्धापन दिनानिमित्ताने आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणावर राज ठाकरे यांनी जाहीर प्रतिक्रिया दिली. माझ्या कार्यकर्त्यांचे रक्त मी वाया जाऊ देणार नाही. ते महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत. या फडतूस लोकांसाठी नाहीत.मनसेने 17 वर्षात काय केले? राज ठाकरेंनी यावेळी डिजीटल पुरावाच सादर केला.     

मनसेचे 13 आमदार सोरटवर निवडून आले होते का? 2014 काय 2019 निवडणुका मोदींची लाट आली… मला काय विचारता. जवळपास 60 ते 65 वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसची अवस्था आता काय आहे ते पाहा. भरती ओहोटी ही नैसर्गिक गोष्ट आहे. राजकारणात ही अशाच प्रकारे भरती ओहोटी येते. सध्या भाजपची भरती सुरु आहे हे लक्षात ठेवावे असं राज ठाकरे म्हणाले.  

आंदोलनं अर्धवट सोडतात असा आरोप नेहमी मनसेवर केला जातो. मात्र, काही वर्षांपूर्वी गळ्यात गळे घालणाऱ्या भाजप आणि शिवसेनेने जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा केली होती. या घोषणेचे काय झाले असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 17 वर्षात मनसेने विविध विषयांवर अनेक आंदोलने केली. मनसेने जितकी आंदोलने केली तितकी आंदोलने एकाही पक्षाने केलेली नाहीत असा दावा राज ठाकरे यांनी केला. मशिदीवरील भोंग्याचा समाचार 22 मार्चला घेणार.

हेही वाचा :  Bharti Singh Weight Loss: खाणेपिणे न सोडता १५ किलो वजन केले कमी, कसे ते घ्या जाणून

डिजीटल पुस्तकाच्या माध्यमातून मनसेच्या कामाचा आढावा

वर्धापन दिना निमित्ताने डिजीटल पुस्तकाच्या माध्यमातून मनसेच्या कामाचा आढावा माडंण्यात आला. 17 वर्षांत मनसेने काय काय केल.  आंदोलनं, तसेच कामाचा लेखाजोखा या पुस्तिकेत आहे. 

नाशिकमध्ये भ्रष्टाचार मुक्त कारभार

नाशिकमध्ये भ्रष्टाचार मुक्त कारभार करुन दाखवला.  नाशिक पालिकेत मनसेच्या कारकिर्दीत पाच वर्षांत एकाही मनसेच्या पदाधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागला नाही. आता नाशिकमध्ये अनेकजण हळहळतायत

मनसेमुळे मोबाईलवर मराठी सूचना सुरू झाली 

मनसेमुळेच मोबाईलवर मराठी रिंगटोन सुरू झाली. मोबाईलमध्ये मराठी रिंगटोनसाठी मनसेनं आंदोलन केलं. त्यानंतर दोन दिवसांतच  मोबाईलवर मराठीतून सूचना सुरु झाल्या. 

मनसेमुळे मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये स्थान मिळाले

मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहांचा मुद्दा मनसेने उपस्थित केला. मनसेमुळे मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये स्थान मिळाले. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नव्हते. मल्टीप्लेक्स चालकांना हात जोडून सांगितलं. ऐकलं नाही. मग हात सोडून सांगितले. शेवटी मराठी चित्रपटांना न्याय मिळवून दिलाच. 

हेही वाचा :  VIDEO : धावत्या बाइकवर बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून तरुणीचा रोमान्स, व्हिडीओ Viral झाल्यानंतर

मराठी पाट्या मनसेमुळे लागल्या

मराठी पाट्यांसाठी आंदोलन का करावं लागतं? कारण बाहेरून येणारे सगळे इथल्या मराठी लोकांना गृहीत धरतात. मनसेच्या आंदोलनानंतर सगळ्या ठिकाणी मराठी पाट्या लागल्या. मग आत्ताचं गेलेल्या अडीच वर्षाच्या सरकारनेही मराठी पाट्या सक्तीच्या करू असे जाहीर केले. 

पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर काढण्याचं काम मनसेनं केलं. बाकीचे हिंदुत्ववादी लोक कुठे गेले होते? भोंग्यांच्या प्रकरणानंतर मला अयोध्येला बोलवलं. विरोध करणारे हिंंदुत्ववादीच. मला आतलं राजकारण कळलं होतं. ज्यांनी हे केलं, त्यांचं काय झालं? असंच असतं. म्हणून आपल्या वाट्याला कुणी जायचं नाही असे राज ठाकरे म्हणाले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …