राबराब राबणाऱ्या हाताचं चीज झाले; हातगाडीवर खाऊ विकणाऱ्याची लेकची IAS पदी गवसणी!

UPSC IAS Success Story दीपेश कुमारीचा युपीएससीचा प्रवास हा चिकाटी आणि जिद्दीचा आहे. राजस्थानच्या भरतपूर येथील, गोविंद नावाच्या एका सामान्य खाऊ विक्रेत्याची दिपेश कुमारी ही मुलगी. तिने दुसऱ्या प्रयत्नात युपीएससीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. इतकेच नाहीतर ९३व्या क्रमांकासह आर्थिक दुर्बल श्रेणीमध्ये चौथा क्रमांक पटकावला.

दिपेश कुमारीची घरची परिस्थिती बेताची. तिचे वडील बरीच वर्षे शहरातील गल्लोगल्ली जाऊन खाऊ व फराळाची विक्री करतात. तिची आई गृहिणी असून मोलमजूरी करून हातभार लावते. पाच भावंडांमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या दीपेशने सर्व अडचणींना तोंड देत तिचे शिक्षण घेतले. भरतपूरमध्ये बारावी पूर्ण केल्यानंतर, तिने जोधपूरच्या एमबीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिलमध्ये बी.ई पदवी मिळवली. नंतर आयआयटी मुंबईमधून एम.टेक पदवी मिळवली, हे सर्व तिच्या कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने साध्य केले. दीपेशच्या प्रयत्नाने प्रेरित होऊन, तिची धाकटी बहीण दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बनली, तर दोन भावांनी लातूर आणि एम्स गुवाहाटी येथून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. दीपेशने शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपला संपूर्ण पगार आपल्या भावंडांच्या शिक्षणात गुंतवला.

एम.टेक.नंतर, दीपेशने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. त्या आधी तिनेएक वर्ष सॉफ्टवेअर कंपनीत काम केले. कॉर्पोरेट जग सोडून परीक्षेची तयारी करण्याचा तिचा निर्णय तसा धाडसी होता. पण तिने साध्य करून दाखवले.

हेही वाचा :  सहावीत नापास पण मेहनतीच्या जोरावर झाली IAS ; वाचा रुक्मणींची यशोगाथा..

दीपेशने २०१९ मध्ये तिची युपीएससीची तयारी सुरू केली. सुरुवातीला दिल्लीतील एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला. पण कोरोनामुळे पुढे तिला घरीच अभ्यास करायला लागला. ती पहिल्या प्रयत्नात अयशस्वी होऊनही तिने मुलाखतीचा टप्पा गाठला आणि दुसऱ्या प्रयत्नात तिने यश गाठले आणि ती आयपीएस अधिकारी झाली.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असूनही कुणाल पाटील झाला IFS अधिकारी!

UPSC Success Story : ग्रामीण भागातील मुलगा उच्च पदावर जातो तेव्हा अनेकांसाठी ती प्रेरणादायी बाब …

वडिलांनी कपडे शिवून मुलाला उच्च शिक्षित केले ; पुलकित झाला हवाई दलात IAF फ्लाइंग ऑफिसर !

Success Story : आपण फक्त स्वप्न बघून चालत नाही तर ती सत्यात साकार करण्यासाठी मेहनत …