“एका मिनिटात…”; Ukraine वर हल्ला करण्याआधी Putin यांनी British PM ला दिलेली धमकी

Putin Threatened Missile Strike British PM Boris Johnson: ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (British PM Boris Johnson) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासंदर्भात धक्कादायक दावा केला आहे. मागील वर्षी म्हणजेच 2022 साली फेब्रवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine War) करण्याआधी झालेल्या ‘एका फोन कॉलमध्ये (ब्रिटनवर) मिसाईल हल्ल्यांची धमकी दिली होती,’ असं जॉन्सन म्हणाले आहेत. हे विधान जॉन्सन यांनी बीबीसीच्या ‘पुतिन विरुद्ध पाश्चिमात्य’ या नावाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये केलं आहे. ही डॉक्युमेंट्री आज ब्रिटनमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

कुठे केला हा दावा?

बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीनुसार जॉन्सन यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये पुतिन यांच्याबरोबर ‘फार वेळ चालेल्या’ कॉलदरम्यान ही धमकी दिल्याचं म्हटलं आहे. ‘सारं काही उद्धवस्त होईल’ अशी धमकी जॉन्सन यांना देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. डॉक्युमेंट्रीमध्ये जॉन्सन पुतिन यांचा संदर्भ देत, “एका क्षणी त्यांनी मला धमकी दिली. ते म्हणाले, बोरिस मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान करु इच्छित नाही. मात्र एका मिसाईने केवळ एका मिनिटात असं काही होऊ शकतं,” असा दावा जॉन्सन यांनी केला आहे.

हेही वाचा :  Petrol- Diesel Price Today: पेट्रोल शंभरी पार तर, डिझेलचे भावही वधारले; जाणून घ्या आजचे दर | Petrol Diesel Price Today 13 March 2022 in Maharashtra Know New Rates Of Fuel

पुतिन यांना दिलेली कल्पना

“ते फार निवांतपणे बोलत होते. चर्चा करण्यासंदर्भातील माझे प्रयत्न कसे आहेत हे ते तपासून पाहत होते,” असंही जॉन्सन म्हणाले. ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी युक्रेनवर हल्ला केल्यास काय परिणाम होतील याची कल्पना पुतिन यांना दिलेली असा दावा केला आहे. युक्रेनवर हल्ला केल्यास पाश्चिमात्य देश प्रतिबंध लागू करतील आणि रशियाच्या सीमेवर ‘नाटो’च्या सैनिकांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या जातील, असं बोरिस यांनी पुतिन यांना सांगितल्याचा दावा केला आहे.

रशियाने आश्वासन दिल्याचा दावा अन् नकार

बोरिस जॉन्सन यांनी आपण पुतिन यांची समजूत काढल्याचंही म्हटलं आहे. रशियाने चिंता करु नये निकट भविष्यामध्ये युक्रेन नाटोचा भाग होणार नाही, असं मी पुतिन यांना म्हणालो होतो, असंही जॉन्सन म्हणाले. या डॉक्युमेंट्रीमध्ये 11 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया आणि ब्रिटनच्या सुरक्षा सचिवांमध्ये झालेल्या बैठकीचीही दृष्य दाखवण्यात आली आहेत. आम्ही युक्रेनवर हल्ला करणार नाही असं आश्वासन रशियाने या भेटीदरम्यान दिलं. मात्र आता दोन्ही बाजूंनी अशी बैठक झाली नाही असं म्हटलं आहे.

युक्रेनच्या पाठीशी जॉन्सन

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाविरोधात अनेक निर्बंधांची घोषणा केली होती. मॉस्कोने मागील वर्षी 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर पहिल्यांदा हल्ला केला होता. जॉन्सन यांनी युक्रेनला लष्करी मदत जाहीर केली होती. युक्रेनला पाठिंबा दर्शवण्यासाठी जॉन्सन यांनी युक्रेनची राजधानी किव्हचाही दौरा केला होता.

हेही वाचा :  अभिनयाबरोबरच आता श्रेया बुगडे 'या' क्षेत्रात आजमावणार नशीब



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …