Prathamesh Parab : प्रथमेशचं ठरलं! चाहत्यांना दिलं लग्नाचं आमंत्रण

Prathamesh Parab : मराठी मनोरंजनसृष्टीत आला लगीनघाईला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. अशातच अभिनेता प्रथमेश परबनेदेखील (Prathamesh Parab) लग्नासंदर्भात एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्रथमेशने चाहत्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. 

सोशल मीडियावर प्रथमेशने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रथमेश नवरदेवाच्या लुकमध्ये दिसत आहे. त्याने शेरवानी परिधान केली असून डोक्याला मुंडावल्या बांधल्या आहेत. तसेच हाहात हार धरला आहे. नवरदेवाच्या लुकमधला फोटो शेअर करत प्रथमेशने लिहिलं आहे,”सगळेच विचारत आहेत… विचार केला सांगूनच टाकू… गुरुवारपर्यंत काय ते कळ काढा”. 

प्रथमेशने शेअर केलेल्या फोटोवर आमचं ठरलं आहे… लग्नाला यायचं ह… पत्रिका गुरुवारी पाठवतोय, असं लिहिलं आहे. प्रथमेशचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रथमेशचे चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आता प्रथमेशने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 


प्रथमेशने शेअर केलेला नवरदेवाच्या लूकमधला फोटो एखाद्या सिनेमाच्या प्रमोशनचा भाग असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश एका मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यामुळे आता गुरुवारी नक्की काय गुड न्यूज देणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

हेही वाचा :  Happy Birthday Zeenat Aman : 70 च्या दशकात सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून झीनत अमान यांची ओळख!

प्रथमेश परबची नवीन वर्षात OTT वर ग्रँड एंट्री

‘ताजा खबर’ (Taaza Khabar) या वेबसीरिजची पहिली झलक गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजमध्ये सचिन पिळगावकरांची लेक श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) मुख्य भूमिकेत आहे. तसेच आणखी एक मराठमोळा चेहरा या सीरिजमध्ये झळकणार आहे. अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh parab) या वेबसीरिजमध्ये पिटरच्या भूमिकेत झळकणार आहे. नव्या वर्षात प्रथमेश परब ओटीटीवर ग्रॅंड एन्ट्री करणार आहे. 

संबंधित बातम्या

Timepass 3 : दगडू आणि पालवी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘टाइमपास 3’चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …