‘या’ 11 क्रिकेटपटूंचा 2022 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, यादीत दिग्गज खेळाडूंचा समावेश

Retired Cricketers List 2022 : 2022 हे वर्ष आता संपत आलं असून अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षातही अनेक क्रिकेटपटूंनी (Retired Cricketers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. या काळात काही जणांनी निवृत्तीचे वय गाठले होते तर काहीनी अचानक क्रिकेटला अलविदा केला. काही क्रिकेटपटूंच्या निवृत्तीच्या निर्णयाने तर संपूर्ण क्रिकेट जगतासह चाहत्यांनाही आश्चर्य वाटले. तर या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंमध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे यापूर्वी विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य देखील होते. या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या काही मोठ्या क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊया…

तर या क्रिकेटर्समधील एक मोठं नाव म्हणजे इयॉन मॉर्गन… इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गनच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विश्वचषक जिंकल्यानंतर पुढील विश्वचषकापूर्वी निवृत्ती जाहीर करणारा तो जगातील पहिला कर्णधार आहे. विश्वचषकानंतर त्याला एकही मोठी खेळी खेळता आली नव्हती हे देखील तितकेच खरं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 मध्ये प्रथमच एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला.

या दिग्गजांनी देखील घेतली निवृत्ती

हेही वाचा :  आतापर्यंत झालेल्या सामन्यांनंतर टॉपवर आहे राजस्थान रॉयल्स, कोणाकडे ऑरेंज आणि पर्पल कॅप?

वेस्ट इंडिजचा मर्यादित षटकांचा कर्णधार कायरन पोलार्डनेही क्रिकेटला अलविदा केला. एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रमही पोलार्डच्या नावावर आहे. त्यांच्याशिवाय विंडीज संघाचे दिनेश रामदिन आणि लेंडल सिमन्स, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस, श्रीलंकेचा सुरंगा लकमल, न्यूझीलंडचा हमिस बेनेट, भारताचा रॉबिन उथप्पा यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या सर्व क्रिकेटपटूंशिवाय इंग्लंडचा सध्याचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून आणि श्रीलंकेचा गुणथिलका याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

News Reels


हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …