कर्नल पुरोहितांच्या पुस्तक प्रकाशनावरुन वाद, मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपीवरील पुस्तकावर आक्षेप

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Bomb Blast 2008) प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित (Lt Col Prasad Shrikant Purohit) यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनावरुन (Book Publishing) वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये (S P College) येत्या 18 डिसेंबरला या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. पण लष्कराकडून कर्नल पुरोहित यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत मनाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर (Social Media) या पुस्तक प्रकाशनाचं पोस्टर व्हायरल (Poster Viral) झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. 

स्मिता मिश्रा लिखित ‘लेफ्टिनेंट कर्नल पुरोहित: द मैन बेट्रेयड?’ या पुस्तकाचं (Lt. Col. Purohit: The Man Betrayed) पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये तीन IPS अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. यासाठी जयंत उमरानीकर, सत्यपाल सिंह आणि संजय बर्वे हे अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाचं संचालन मेजर गौरव आर्य करणार आहेत. तर पुस्तकाचं प्रकाशन वितस्ता पब्लिशिंग रेणू कौल वर्मा यांनी केलं आहे.

पुस्तक प्रकाशनला विरोध
हे पुस्तक प्रकाशित होऊ नये अशी मागणी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील पीडित वकील शाहिद नदीम यांनी केली आहे. अश्या पद्धतीने पुस्तक प्रकाशन करून न्यायालयाचा अवमान असल्याचं शाहिद नदीम यांनी म्हटलंय. तर न्यायालयाचा कोणताही अवमान होणार नसल्याचा दाव लेखकाने केला आहे. 

हेही वाचा :  औरंगजेबाचा उल्लेख करत तरुणाने बनवला रिल, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल... Video

काय आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण?
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधल्या भिकू चौकाजवळ एका दुचाकीचा स्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 92 जण जखणी झाले. तत्कालीन गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवला. 23 ऑक्टोबर 2008 मध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, राकेश धावडे, राजा रहिकार आणि जगदीश म्हात्रे यांना आरोप म्हणून कोर्टात हजर करण्यात आलं. पण या स्फोटात लष्करी जवानाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली.

हे ही वाचा : Maharashtra Politics : मविआच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपची रणनिती, उद्या माफी मांगो आंदोलन

कर्नल पुरोहित यांना सहभाग
मालेगाव बॉम्बस्फोटात सहभागी असल्याच्या कारणावरुन 4 नोव्हेंबर 2008 रोजी लष्करातील ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना मध्यप्रदेशातून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना जामीन मंजूर केला.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …