नेस्लेच्या ‘ब्रेक अँड बेक’मध्ये लाकडी चिप्स, कंपनीने देशातील ग्राहकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Nestle: नेस्लेच्या टॉल हाऊस चॉकलेट चिप कुकीतील काही ‘ब्रेक अँड बेक’ उत्पादनांमध्ये लाकडी चिप्स आढळल्याचे समोर आले होते. यानंतर कंपनीने आता मोठा निर्णय घेत देशभरातून हे प्रोडक्ट परत मागवले आहेत. 
आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार, प्रोडक्टमुळे कोणताही आजार किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही. पण काही ग्राहकांनी बारमधील लाकडाच्या तुकड्यांबद्दल कंपनीकडे संपर्क साधला होता. यानंतर आम्ही खूप सावधगिरीने कुकी बार परत मागवले आहेत. 

नेस्ले ही जगातील सर्वात मोठी अन्न आणि पेय कंपनी असून ते आपल्या प्रोडक्टविषयी संवेदनशील असतात. या वर्षाच्या सुरुवातीव 24 आणि 25 एप्रिल रोजी उत्पादित केलेली टॉल हाऊस ‘ब्रेक अँड बेक’ बार उत्पादनांचे दोन वेगळ्या बॅच केल्या आहेत. 

ज्या ग्राहकांनी बॅच कोड 311457531K आणि 311557534K सह चॉकलेट चिप कुकी dough बार खरेदी केले आहेत त्यांना ते उत्पादन न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांना उत्पादन बदलून किंवा रिफंड करुन मिळणार आहे. 

नेस्ले कंपनी जगभरातील 188 देशांमध्ये उत्पादने विकते. ते यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) सोबत काम करत आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य करेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा :  Pune Crime News : शरद मोहोळचा गेम का झाला? टोळीत माणूस पेरून केला गेम; पोलिसांनी सांगितलं कारण!

ही एक वेगळी समस्या आहे आणि आम्ही त्यावर उपाययोजना आखल्या आहेत असे नेस्ले यूएसएच्या प्रवक्त्याने सांगितले.  आमच्या उत्पादनांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि अखंडता ही आमची प्रथम क्रमांकाची प्राथमिकता आहे. आमच्या  ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असेही ते म्हणाले.

लाकडाचे तुकडे पोटात गेल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.  लाकडाचे तीक्ष्ण तुकडे पाचन तंत्राच्या अंतर्गत अवयवांना इजा करू शकतात, ज्यामध्ये घसा, जीभ आणि आतडे यांचा समावेश होतो.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …