“नवाबी हो यांचे थाट… डी कंपनीची आवडे वाट… यांचे बजेट…”; कवितेतून मुनगंटीवार यांची बजेटवर टीका | sudhir mungantiwar slams Thackeray Government With Poem on maharashtra budget 2022 scsg 91


अर्थ विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने थोड्या फार प्रमाणात का होईना गाई-म्हशींचे गोठे दिल्याचा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला.

महाविकास आघाडी सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात मागील दोन अर्थसंकल्पातील घोषणाच पुन्हा नव्याने करण्यात आल्या असून अंमलबजावणीऐवजी केवळ त्याच त्या घोषणा करणारा हा फसवा आणि सुमार अर्थसंकल्प असल्याची टीका करत कसे म्हणावे यास बजेट…मागचेचे मांडले सारे थेट अशा शब्दांत माजी अर्थमंत्री व भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत सरकारची खिल्ली उडवली.

मुनगंटीवार यांचा हल्लाबोल…
राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सुधीर मुनगंटीवार बोलत होते. पुणे रिंगरोड प्रकल्पाची घोषणा अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या २०२०-२१ च्या पहिल्या अर्थसंकल्पात केली होती. त्यास पुन्हा पुणे चक्राकार प्रकल्प असे म्हणत मागच्या अर्थसंकल्पातही त्याचा उल्लेख केला आणि आता यंदाच्या अर्थसंकल्पातही याच प्रकल्पासाठी भूसंपादनासाठी तरतुदीची घोषणा केली. शिर्डी विमानतळ, अमरावती विमानतळ, वाशी येथे महाराष्ट्र भवन, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान या घोषणाही मागील अर्थसंकल्पांमधून जशाच्या तशा पुन्हा या अर्थसंकल्पात आल्या आहेत. केवळ घोषणा करायच्या व त्यावर अंमलबजावणी शून्य असल्यानेच त्याच त्या घोषणा प्रत्येक अर्थसंकल्पात नव्याने करण्याची वेळ सरकारवर आल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली.

हेही वाचा :  कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा! | Maharashtra Budget 2022 Updates:Maharashtra Budget 2022 News updates, photos, videos in Marathi.

पवारांच्या नावाने गाई-म्हशींचो गोठे दिले…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सरकार पर्यावरणपूरक १५०० बस घेण्याचे महाविकास आघाडी सरकारने मागील अर्थसंकल्पात जाहीर केले. पण केवळ १ बस घेतली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेही सरकारने अन्नदाता शेतकऱ्यांना फसविले. फुले आणि ठाकरेंच्या नावाच्या योजनांसाठी काहीही न करणाऱ्या अर्थ विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने थोड्या फार प्रमाणात का होईना गाई-म्हशींचे गोठे दिल्याचा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला.

विदर्भ व मराठवाड्यावर अन्याय…
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विदर्भ-मराठवाड्यावरील अन्याय वाढला आहे. अधिवेशन घेणार असे जाहीर करून ते घेतले जात नाही. विदर्भ व मराठवाड्याचे हक्काचे वैधानिक विकास मंडळ काढून घेतले. २०१३ पासून देण्यात येणारा धानाचा बोनस बंद करण्यात आला. लोकसंख्येच्या प्रमाणात या दोन विभांगात नोकर भरती करण्याचा निर्णयावरही अंमलबजावणी नाही, असा संताप मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

भास्कर जाधवांनी दिलं उत्तर…
अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांवर आक्रमकपणे प्रतिहल्ला चढवला. आमच्या सरकारच्या योजना जुन्याच असल्याची टीका करत पण केंद्रातील मोदी सरकारने यूपीए सरकारच्याच योजना नव्या रूपात सुरू ठेवल्या व काहींवर आधी टीका करून नंतर त्यांचाच उपयोग केल्याची टीका करताना आधार कार्ड, मनरेगा आदी योजना व ईव्हीएमची उदाहरणे जाधव यांनी दिली. वाइनबद्दलच्या निर्णयावर टीका करता पण मध्य प्रदेशमधील तुमच्याच सरकारने मद्याबाबत घेतलेल्या निर्णयावर का गप्प बसता, असा सवाल भास्कर जाधव यांनी भाजपला केला

हेही वाचा :  CNG स्वस्त; शेतकऱ्यांना अनुदान आणि...; जाणून घ्या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या घोषणा | What we get through the maharashtra budget 2022 for common people - vsk 98

…तेव्हा औऱंगाबादचे संभाजीनगर का केले नाही?
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह सत्ताधारी बाकांवरील आमदार वेळोवळी बाक वाजवून जाधव यांच्या भाषणाला दाद देत होते. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत मुख्यमंत्री व पंतप्रधान तुमच्याच पक्षाचे असताना औरंगाबादचे संभाजीनगर केले नाही व आताच ते आठवते. हे तुमचे ढोंग मतदार व महाविकास आघाडीचे आमदार ओळखून आहेत, असा टोलाही जाधव यांनी लगावला.

रोहित पवार यांचा सल्ला आणि शाब्दिक हल्ला…
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करताना केंद्रीय नोकऱ्यांमधील महाराष्ट्रातील तरुणांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारने तालुकापातळीवर यंत्रणेचा वापर करावा, अशी सूचना केली. त्याचबरोबर राज्यातील नोकऱ्यांसाठी टीसीएससारख्या यंत्रणांचा भरती प्रक्रियेत उपयोग करण्याचा निर्णय चांगला असल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजप सरकारपेक्षा महाविकास आघाडी सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वी ठरली व त्यात ९९ टक्के लाभार्थ्यांना पैसे दिल्याचे रोहित पवार यांनी लक्ष वेधले. केंद्राच्या आरोग्य योजनेत देशात ५ लाख लोकांनी सहभाग घेतला तर केवळ महाराष्ट्र सरकारच्या योजनेत ६ लाखांपेक्षा अधिक लाभार्थी असल्याची आकडेवारी त्यांनी सादर केली. महाराष्ट्राचा अवमान होतो तेव्हा भाजपचे लोक मान खाली घालून मौन बाळगतात अशी टीका रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज व फुले दाम्पत्यावरील विधानाचा संदर्भ देत केली.

हेही वाचा :  मुंबईतील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटींचा निधी

मुनगंटीवार यांनी सादर केलेली कविता खालीलप्रमाणे…

परस्परांची करे वकिली
ध्येय यांचे फक्त वसुली

नवाबी हो यांचे थाट
डी कंपनीची आवडे वाट

यांचे बजेट फुसका बार
खोटी ती वचने भरोभार

महाविकासचे भकास तुणतुणे
जनतेच्या तोंडाला पुसली पाने

ऑटो भंगार तीन चाकांचा
जनतेच्या हा नाही कामाचा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : मतदान करा अन् बिअर, कॅब राईड मोफत मिळवा; कधीपर्यंत वॅलिड आहेत या ऑफर?

Loksabha Election 2024 : देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणुकीच्या पर्वाला सुरुवात झाली असून देशातील सरकार …

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …